Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाचे संकल्पपत्र ही महाराष्ट्राच्या विकासाची पंचवार्षिक गॅरंटी

चिमूर येथील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

najarkaid by najarkaid
November 12, 2024
in Uncategorized
0
भाजपाचे संकल्पपत्र ही महाराष्ट्राच्या विकासाची पंचवार्षिक गॅरंटी
ADVERTISEMENT

Spread the love

भाजपाच्या संकल्पपत्राद्वारे महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी आम्ही अनेक योजना आखल्या आहेत. येत्या पाच वर्षाकरिता हे संकल्पपत्र म्हणजे विकासाची गॅरंटी आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चिमूर येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना दिली. गेल्या अडीच वर्षांत डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा दुप्पट वेग महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवला आहे, प्रत्येक विकास योजनेत खोडा घालणाऱ्या महाविकास आघाडीचा कारभारही जनतेने अनुभवला  आहे, असे सांगून मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती. शोभाताई फडणवीस, भाजपा- महायुतीचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे आदी उपस्थित होते

आज महाराष्ट्रात एक डझन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. शंभराहून अधिक रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे, बंदरांचा विकास होत आहे, महामार्ग निर्माण होत आहेत, नवे रेल्वेमार्ग बांधले जात आहेत. महायुतीचे सरकार वेगवान काम करते, मात्र महाविकास आघाडीवाले त्यामध्ये अडथळे आणतात. महाराष्ट्राचा एवढा वेगवान विकास ही आघाडीवाल्यांच्या आवाक्यातील बाब नाही, त्यांनी केवळ विकासकामे लटकावणे, अडकविणे आणि भरकटवणे यांत नैपुण्य मिळविले आहे. अडीच वर्षांत मेट्रो, वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग आणि प्रत्येक विकास योजनेत खोडा घातला. आघाडी म्हणजे ‘भ्रष्टाचार का सबसे बडा खिलाडी’ आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीवर कडाडून टीका केली. त्यांना पुन्हा महाराष्ट्र लुटण्याचा परवाना देऊ नका, असे आवाहनही श्री. मोदी यांनी  केले.

काँग्रेस व त्यांचे साथीदार हिंसा आणि विभाजनवादाच्या तव्यावर राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत. अलीकडेच जम्मू काश्मीर विधानसभेत जे झाले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. जम्मू काश्मीर कित्येक दशकांपासून विभाजनवाद आणि दहशतीच्या आगीत जळत राहिला. महाराष्ट्राचे अनेक जवान मातृभूमीचे रक्षण करताना त्या भूमीत शहीद झाले. हे पाप कोणाचे, असा सवालही मोदी यांनी केला. ज्या 370 व्या कलमाआडून हे सारे झाले ते कलम 370 ही काँग्रेसची देणगी होती. आम्ही हे कलम रद्द केले, काश्मीरचे भारत व भारताच्या संविधानाशी नाते जोडले. बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशाने स्वीकारले, लागू केले, पण संविधानाची जपमाळ ओढणाऱ्या या लोकांनी सात दशकांहून अधिक काळ जम्मू काश्मीरमध्ये मात्र संविधान लागू केले नव्हते. मोदी सत्तेवर येण्याआधी देशात दोन संविधान अमलात होते. बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशात तर, जम्मू काश्मीरमध्ये दुसरे संविधान लागू होते. 370 व्या कलमाच्या भिंतीने बाबासाहेबांच्या संविधानास जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश रोखला होता. जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही हे कलम कायमचे गाडून टाकले आहे. पण काँग्रेसवाले आणि त्यांचे सहकारी हे सहन करू शकत नाहीत, म्हणून पाकिस्तानला हवे असलेले 370 कलम पुन्हा लागू करण्याचा ठराव विधानसभेत आणून संमत करण्यासाठी ते धडपडत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले बाबासाहेबांचे संविधान पुन्हा एकदा हटविण्याचे काम करण्याचा त्यांचा इरादा जनता कदापि यशस्वी  होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

चंद्रपूरच्या भागात नक्षलवाद्यांच्या हैदोसामुळे हिंसाचार वाढला, औद्योगिक विकास रोखला गेला, काँग्रेस व त्यांच्या साथीदारांनी जनतेला खुनी खेळात ढकलले. आम्ही नक्षलवादाचा बीमोड केल्याने आता हे क्षेत्र सुटकेचा श्वास घेत आहे. चिमूर आणि गडचिरोलीच्या परिसरात विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, आणि पुन्हा नक्षलवाद उचल घेणार नाही यासाठी काँग्रेस व त्यांच्या साथीदारांना इकडे फिरकू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस आणि त्यांचे साथीदार ओबीसी, आदिवासी, दलितांमध्ये फूट पाडून संघटित समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून या धोकादायक खेळापासून सावध रहा,’ एकत्र असू तरच सुरक्षित राहू’ असेही ते म्हणाले. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाजपा -महायुती सरकारचा मंत्र आहे, गरीबांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो, कोट्यवधी गरीबांना घरे मिळाली, मोफत उपचारांची हमी मिळाली, नव्या सरकारच्या पहिल्या काही दिवसांतच आयुष्मान योजनेचा लाभ 70 वर्षांवरील प्रत्येकास दिला, गावागावात रस्ते, वीज पोहोचविली, कोट्यवधी कुटुंबांना पाणी जोडण्या मिळाल्या, एकट्या चिमूर जिल्ह्यात 16 लाख कुटुंबांना मोफत धान्य मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. गरीब कल्याण योजनांचा सर्वाधिक फायदा वंचित, दलित, पीडीत, ओबीसी आदिवासींना मिळाला आहे. असे सांगून विदर्भातील विकास कामांची संपूर्ण यादीच मोदी यांनी सादर केली. या विकासकामांमुळेच गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकसंख्या गरीबीतून बाहेर आली, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात महायुती सरकार याच योजना पुढे राबवून महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना समृद्ध बनवेल, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी आमदार भोळेंना दिली विजयाची खात्री

Next Post

तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील

तरुणांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच - गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us