पारोळा | प्रतिनिधी – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘समाज भूषण’ राज्यस्तरीय पुरस्काराच्या निमित्ताने तसेच कोअर कमिटी अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल पारोळा येथे आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी आमदार अमोल पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांचा जाहीर सत्कार केला.
प्रतितिरुपती श्री बालाजी महाराज मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, व्यापारी बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या पत्रकारिता, सामाजिक कार्य तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन लोकदर्पण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनानंतर समारंभ उत्साहात संपन्न झाला.











