Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

najarkaid by najarkaid
July 16, 2026
in जळगाव
0
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी
ADVERTISEMENT

Spread the love

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

जळगाव, प्रतिनिधी : राजपूत समाजाच्या सन्मान, स्वाभिमान आणि हक्कांच्या संरक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महिला सक्षमीकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक कुटुंबाने मुलींच्या शिक्षणाला, सुरक्षिततेला आणि नेतृत्व विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील एकोपा, शिक्षण, युवकांचे संघटन, सामाजिक उत्तरदायित्व आणि सेवा कार्य यांसारख्या विविध विषयांवरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे दिनांक 12 रोजी आयोजित भव्य सामाजिक कार्यक्रमात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी यांनी अध्यक्षीय भाषणातून समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या विचारांवर चालणारे करणी सेनेचे कुटुंब आज देशातील ३० राज्यांमध्ये विस्तारले आहे. दादांनी समाजासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची असून प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने कार्य करून त्यांचे विचार घराघरात पोहोचवावेत, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढवून समाजसेवेचा विस्तार करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कार्यक्रमात ‘राजपूत समाज भूषण पुरस्कार’ प्राप्त मान्यवर तसेच दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या सर्व पुरस्कारार्थी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दादा गोगामेडींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार; प्रवीणसिंह पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष विलाससिंह पाटील यांनी केले. त्यांनी संघटनेच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या विचारांवर चालत समाजहिताची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यानंतर श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार यांनी स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अपार तळमळीचे स्मरण केले. दादांनी समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेला संघर्ष, संघटन उभारणीसाठी केलेले अथक परिश्रम आणि समाजहितासाठी केलेले समर्पण हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले, “दादांसोबत मी कायम हनुमानाच्या भूमिकेत निष्ठेने उभा राहिलो. आजही आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी यांच्या नेतृत्वाखाली त्याच निष्ठेने आणि समर्पणाने संघटनेची सेवा करत राहीन.” त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी “भाबीसा… आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं!” असा जोशपूर्ण जयघोष केला. या घोषणेला उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने आणि घोषणांनी दणाणून सोडले.

यावेळी त्यांनी उपस्थित समाजबांधवांना स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या विचारांचा वारसा अधिक ताकदीने पुढे नेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार प्रवीणसिंह पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतल्याची अधिकृत घोषणा योगेंद्रसिंह कटार यांनी केली. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रवीणसिंह पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले.

यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा अँड. शीला सुखदेव गोगामेडी, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार , अभयसिहं गोगामेडी, आनंदसिंह ठोके,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिहंपाटील, कृषी तज्ज्ञ के. बी. पाटील, नगरसेविका ऍड. सुचिताताई हाडा,नगरसेवक नरेंद्रसिंह पाटील , प्रा. डॉ. विश्वजित सिसोदिया, राष्ट्रीय सचिव सुरजितसिंह ठाकूर, राष्ट्रीय नेते प्रवीणसिंह राठोड, महाराष्ट्र प्रभारी जीवनसिंह सोलंकी, प्रदेशाध्यक्ष डॉ. जीवनसिंह राजपूत, महिला प्रदेशाध्यक्ष छाया महेर, कोअर कमिटी (महाराष्ट्र) अध्यक्ष बाळासाहेब पाटील, वरिष्ठ मार्गदर्शक रामसिंह राजपूत, नेपाळसिंह नेहरा, प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, संदीपसिंह राजपूत, अभयसिंह राजपूत, विभागीय अध्यक्ष विलाससिंह पाटील (खान्देश), विजयसिंह महेर (मराठवाडा), किरण राजपूत, संदीप राणा, सारिका ताई विठ्ठलसिंह मोरे, भगवानसिंह खंडाळकर, रोशन राजपूत, विकास राजपूत, वैभव धीरज परदेशी, विश्वजित सिसोदिया, रामचंद्र पाटील (सर),भरत आप्पा पाटील, तृप्ती ताई महाजन, समाधान महाजन, दिलीपसिंह पाटील, सुशांतसिंह जाधव, मोहनसिंह पवार, श्याम राजपूत, अजयसिंह राजपूत, कल्पिता ताई पाटील, मयूर राजपूत, संग्रामसिंह सूर्यवंशी, निलेश राजपूत, चंद्रशेखर राजपूत, जीवन राजपूत, गजानन राजपूत, धनंजय परदेशी, महेंद्रसिंह राजपूत, संग्राम शिसोदे, निलेश शिसोदे, विलासिंह पाटील (वराडशीम), प्रवीण पाटील (वरणगाव), दिवाणसिंह राजपूत (भुसावळ), कोमलसिंह राजपूत, विकाससिंह राजपूत, बी. जी. राजपूत, सुरेशसिंह राजपूत (सर), जालमसिंह राजपूत, रतन राजपूत, अनुपसिंह हजारी तसेच जिल्ह्यातील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे पदाधिकारी, उद्योजक, विविध क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, प्रथम सूर्यवंशी, ईश्वर जाधव, संदीप राजपूत यासह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पाटील, रोशन राजपूत, रोहित राजपूत, वैभव मोरे, आशिष राजपूत, अभिजित राजपूत, अजय जाधव, विकास राजपूत, वसुंधरा फाऊंडेशन टीम, यशवंत भोई यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

Next Post

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us