Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद !

कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू

najarkaid live by najarkaid live
October 10, 2021
in Uncategorized
0
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरू आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहेत. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रिअल टाईम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणीदेखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) काल, शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेच्या मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता…पण, आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणता वाचा….

Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘या’ पदासांसाठी करा अर्ज…

Related Posts

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Next Post
जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘या’ पदासांसाठी करा अर्ज…

जिल्हा सामान्य रुग्णालयात 'या' पदासांसाठी करा अर्ज...

ताज्या बातम्या

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

February 23, 2026
NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us