Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

‘ज्ञानदीप’ अभियानांतर्गत विवेक यशवंते यांच्या वाढदिवसानिमित्त संत चोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप

najarkaid by najarkaid
August 16, 2026
in जळगाव
0
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे
ADVERTISEMENT

Spread the love

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

‘ज्ञानदीप’ अभियानांतर्गत विवेक यशवंते यांच्या वाढदिवसानिमित्त संत चोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव, (प्रतिनिधी) :“उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणातून परिवर्तन आणि क्रांती घडवून आणता येते, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून ध्येय निश्चित करावे. तुम्हीच देशाचे उद्याचे भविष्य आहात. आज मिळणारे शैक्षणिक साहित्य ही मदत म्हणून स्वीकारू नका; तर समाजाने तुमच्याकडून ठेवलेली एक आशा म्हणून स्वीकारा,” असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ज्ञानदीप’ अभियानांतर्गत विवेक यशवंते यांच्या वाढदिवसानिमित्त संत चोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप निर्मल यशवंते आणि प्रविण सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रविण सपकाळे म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून समाज आणि देशाच्या परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि क्रांती घडू शकते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी.

“विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य आणि डोळ्यांत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न” या भावनेतून राबविण्यात आलेल्या ‘ज्ञानदीप’ अभियानाचे विवेक यशवंते, निर्मल यशवंते यांच्यासह वसतिगृह प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुढे जाण्यासाठी मदतीचा हात देण्याचे कार्य ‘ज्ञानदीप’ अभियानाच्या माध्यमातून सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई व प्रज्ञावंत फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी संत चोखामेळा वसतिगृहाचे शिक्षक सम्यक इंगळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

Next Post

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us