Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

महिला प्रदेशाध्यक्षपदी शुभांगीताई राजपूत यांचा पदग्रहण सोहळा; समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
August 17, 2026
in जळगाव
0
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत
ADVERTISEMENT

Spread the love

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

महिला प्रदेशाध्यक्षपदी शुभांगीताई राजपूत यांचा पदग्रहण सोहळा; समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण  करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

जळगाव,(प्रतिनिधी):खांद्याला खांदा लावून काम करणारा संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद आहे असे प्रतिपादन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांनी केले. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाची व जबाबदारीची जाणीव ठेवून संघटनेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष शुभांगी राजपूत पदग्रहण सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत प्रवीणसिंह पाटील म्हणाले की, समाजात उद्योजक घडविण्यासोबतच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर संघटनेचा भर राहणार आहे. संघटनात्मक ताकद वाढवून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश प्रवीणसिहं पाटील यांच्या हस्ते रोजगार फॉर्म चे अनावर करतांना अन्य मान्यवर

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी शुभांगीताई राजपूत यांनी प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण केले. पदग्रहणानंतर त्यांनी संघटनेची शपथ घेत उपस्थितांना मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रोजगार मेळाव्याच्या नोंदणीला सुरुवात

आगामी रोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी उमेदवार नोंदणी फॉर्मचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आजपासून रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांची नोंदणी सुरू करण्यात आली असून, जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

‘ज्ञानदीप’ अभियानांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानदीप’ अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पदग्रहण सोहळा, रोजगार मेळाव्याची नोंदणी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक व संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा राजपूत समाज समन्वयक महाराष्ट्र श्री. विलाससिंह पाटील (मुक्ताईनगर) यांचा श्री. निलेशसिंह राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. प्रवीणसिंह पाटील, नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष सौ. शुभांगीताई पाटील, महंत परमपूज्य रविंद्रसिंह महाराज, ४० गाव ह.भ.प. गजानन महाराज वरसाळेकर, कोअर कमिटी चेअरमन महाराष्ट्र श्री. बाळासाहेब पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री. दामोदरसिंह राजपूत, श्री. भगवानसिंह खंडाळकर, प्रदेश उपाध्यक्ष श्यामसिंह राजपूत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशचे संचालक प्रवीण सपकाळे, युवक कार्यकारी अध्यक्ष रोशनसिंह राजपूत, प्रदेश प्रवक्ता प्रा. डॉ. विश्वजितसिंह सिसोदिया, जळगाव खान्देश प्रमुख विरुभाऊ राजपूत, जिल्हा प्रमुख विठ्ठलसिंह मोरे, संदीपसिंह राणा, महिला जिल्हा प्रमुख सारिका राजपूत, देवयानीताई ठाकरे, अजय राजपूत, विकास राजपूत, अभिजित राजपूत, सुनीलभाऊ राजपूत यांच्यासह श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र टीमचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख विक्रमसिंह ठाकूर, किरणसिंह भाऊ राजपूत, मिडिया प्रभारी सुनील गोशिंगे, खानदेश उपाध्यक्ष पी.जी. पाटील सर, युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पवनसिंह बैनाडे, कार्यकारी अध्यक्ष मराठवाडा अजबसिंह शिहिरे, जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर अमरसिंह ठाकूर, युवा जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर किरणसिंह डोंगरजाल, मिडिया प्रमुख मराठवाडा अनिलभाई गुसिंगे, उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर सुदाम राजपूत, युवा जिल्हा कोषाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर सोनू बेडवाळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पारोळा नगरपालिका उपाध्यक्ष रोहनभाऊ मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पदाधिकारी, पारोळा पोलिस पाटील संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, भारतीय बौद्ध संघ तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विश्वजीत सिसोदिया यांनी केले तर आभार रोशन राजपूत यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

Next Post

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us