Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगावं नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर कारवाई करावीची मागणी-  महाविकास आघाडी तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

najarkaid by najarkaid
May 2, 2020
in Uncategorized
0
वरणगावं नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर कारवाई करावीची मागणी-  महाविकास आघाडी तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं (अंकुश गायकवाड):- महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी विनाकारण प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी उपोषणाचा बनाव करून कोरोनाच्या महाभयंकर परीस्थितीत नगरपरिषद समोर टेंट टाकून पोलीस उपनिरीक्षक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व सर्व अधिकारी वर्ग यांना वेठीस धरले होते, प्रशासनाचा महत्वाचा वेळ वाया घालवला.
सरकारी कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी पाच ते दहा टक्के कामावर उपस्थिती द्यावी असे कळवले असतांना सुद्धा विनाकारण कार्यालयात गर्दी केली जाते. अनावश्यक कामांची टेंडर काढणे, अनावश्यक ते काम सुरू करणे असे अवैध काम पालिकेत सुरू आहे. जिल्हाबंदीत अडकलेल्या अधिकाऱ्यांना हजर करा म्हणून उपोषण करण्याचा घात घातला होता. संबंधित वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री बोरसे साहेब व नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गोसावी साहेब यांनी या सर्व उपद्रविंना समजून सांगितल्याने त्यांनी उपोषण स्थगित केल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितले होते.
महाराष्ट्र राज्यात तसेच जळगाव जिल्ह्याचा वरणगाव शहरात संपूर्ण लॉक डाऊन असताना देखील कलम 144 व 188 लागू असून देखील यांनी उपोषणाचा बनाव केला व प्रशासनाला धारेवर धरले याचा सर्वप्रथम महा-आघाडीच्या वतीने निषेध करतो व अशा या संकट समयी शहराचे प्रथम नागरिक व त्यांचे सहकारी उपनगराध्यक्ष हे जर अशाप्रकारे प्रशासनाला धारेवर धरत असतील व विनाकारण जमाव जमवत असतील आणि स्वतःच्या फायद्यासाठी गरज नसताना संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून लोकडाउनचे उल्लंघन करण्यास भाग पाडत असतील तर आपण आमच्या या अर्जाची दखल घेऊन संबंधित नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करावी व यापुढे असा बालिशपणा करणार नाहीत त्याबाबत त्यांना आपल्या स्तरावर कृपया लेखी समज द्यावी अशी विनंती केली आहेत.
वरणगाव शहरात सरकारची बदनामी व्हावी या हेतूने वरणगावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना देखील चुकीचे नियोजन करून आठ दहा दिवस लोकांना पाण्यासाठी ताकत ठेवण्याचे घोर पाप वरणगाव नगरपरिषद येथील अधिकारी व कर्मचारी तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे मिळून करत आहेत. एवढ्या महाभयंकर परिस्थितीत जनतेला धीर देणे ऐवजी पाण्याचे राजकारण वरणगावात सर्रास सुरू आहे. याबाबतही आपण विचार करावा व संबंधितांना समज द्यावी. तसेच वरणगाव नगरपरिषदेच्या आवारात लोकडाऊनचे सर्रास उल्लंघन करून, रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकडाउनचे उल्लंघन करून फोटोसेशन व साहित्य वाटप करण्यात येत होते.आणि त्याच नगरपरिषदेने वरणगावात दोन दिवसाचे कडकडीत बंद जाहीर करून त्याचा स्वतःचा फज्जा उडवला. यासर्व नियमबाह्य घटनांसाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, जबाबदार आहेत. त्यांच्यावर देखील आपल्या स्तरावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी समाधान महाजन(शिवसेना तालुका प्रमुख),विलास मूळे(उपजिल्हा संघटक,शिवसेना रावेर लोकसभा),दीपक मराठे(राष्ट्रवादी काँग्रेस,तालुका अध्यक्ष),पंकज पाटील(तालुका अध्यक्ष, काँग्रेस पार्टी),संतोष माळी(राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

वरणगावं मुख्याधिकारी यांना नोटीस
वरणगावं येथील मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी अधिकार नसतांना त्यानीं स्वमताने दोन दिवसांचा जनता कफ्यु पाळण्यासाठी नागरिकांना वेठीस धरल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी त्यानां नोटीस बजावली आहे. संदरली नोटीस मध्ये अश्याप्रकारे आदेश अथवा सुचना फक्त केंद्रशासन/राज्यशासन/जिल्हाधिकारी/तहसीलदार हेच देऊ शकतात. त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येऊ नये? याबाबत त्वरित ईमेलद्वारा खुलासा सादर करावा असे पत्र पाठविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव शहरातील होणारी लोडशेडिंग बंद करा – नगराध्यक्ष सुनील काळे

Next Post

वरणगाव शहरात लॉक डाऊनच्या काळात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करा

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
वरणगाव शहरात लॉक डाऊनच्या काळात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करा

वरणगाव शहरात लॉक डाऊनच्या काळात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करा

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us