जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपा पक्षात दोन महिने पूर्ण होण्याधीच भाजपाला सोडचिठ्ठी देत उद्योजक श्रीराम पाटील यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रावेर लोकसभेतून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता
सुरवातीपासूनच उद्योजक श्रीराम पाटील रावेर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मात्र भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्याने श्रीराम पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपात जाऊन त्यांची अडचण झाली होती. भाजपा कडून रावेर लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र भजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा रक्षा खडसेनां संधी दिल्याने दोन महिन्यापूर्वी भाजपात प्रवेश केलेले श्रीराम पाटील यांनी भजपाला सोडचिठ्ठी देत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असल्याने आता राष्ट्रवादीकडून त्यांना रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर होऊ शकते लवकरच श्रीराम पाटील यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील होईल लढत
भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्षाने तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत तर नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवीन चेहरा उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने दोघांमध्ये सरळ लढत पाहायला मिळू शकते.










