जळगाव – दि.09/03/2020 सोमवार रोजी *डॉ. विजय एस. तुंटे, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर, जि. जळगांव* यांच्या मार्गदर्शनाखाली *डॉ. जयेश विक्रम पाडवी * यांचा कबचौ उमवि येथे Ph. D. करिता viva-voca examination यशस्विरित्या पार पडले. प्रस्तुत परिक्षेचे चेअरमन म्हणून कबचौ उमविचे मानव्य विद्याशाखेेचे अधिष्ठाता व धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. प्रमोद पवार तसेच बहिस्थ परीक्षक म्हणून *डॉ. एस .एम वाघ * (मुंबई विद्यापीठ ) हे मान्यवर उपस्थित होते. सदर परीक्षेनंतर विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते Notification देऊन डॉ. जयेश पाडवी यांचे अभिनंदन केले.
डॉ. विजय तुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली Ph. D. पदवी संपादीत करणारे डॉ. जयेश विक्रम पाडवी हे दुसरे विद्यार्थी आहेत.* त्यांनी “महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या विकास योजनेत जिल्हापरिषदेची भूमिका -विशेष संदर्भ ” धुळे नंदुरबार जिल्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास (१९९८ -२०१४)” या संशोधन विषयात डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. याकरिता डॉ. विजय तुंटे (मार्गदर्शक) व Ph. D. संपादनबद्दल डॉ. जयेश पाडवी यांचेही के. सी. इ. सो.चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाळे , प्राचार्य प्रा. डॉ. सं. ना. भारंबे, संचालक, प्रा. देवेंद्र इंगळे (सामाजिक शास्त्रे प्रशाळा), संचालक, प्रा. डॉ. भुपेंद्र केसुर (कला व भाषा प्रशाळा), प्रा. डॉ. चंद्रमणी लभाणे, प्रा. संजय हिंगोणेकर (प्रमुख, राज्यशास्त्र विभाग ), प्रा. कृष्णा वळवी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.















