मुंबई – आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे.
देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.














