Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

लाखोंची पारितोषीके; मालिकावीर ला मिळेल ‘पल्सर’

najarkaid by najarkaid
April 26, 2026
in राज्य
0
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २६ प्रतिनिधी –  कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिगचा महासंग्रामाची ग्रॅण्ड फायनल रविवारी दि.२६  रोजी होणार आहे. रात्री ७.३० वाजेपासून सामन्याला सुरवात होईल. सामना संपल्यानंतर लाखोंची पारितोषिके पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुंबईचे मयंक पारिख, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सर्व पदाधिकारी, तसेच जळगाव क्रिकेट लीग चे सर्व सहकारी व संघ मालकांसह मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. संपूर्ण जेसीएल मध्ये मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला पगारिया ऑटो तर्फे ‘पल्सर’ बाईक दिली जाणार आहे.

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह वैयक्तिक कामगिरीसाठी चॅम्पियन्स, (विजेता), उपविजेता, ३rd प्लेस, ४th प्लेस, फेयर प्ले पुरस्कार, प्लेयर ऑफ द लीग, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतील सगळ्यात अधिक षटकार, स्पर्धेतील सगळ्यात अधिक निर्धाव चेंडू,स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल या विशेष पुरस्कारांनी सम्मानित केले. विजेत्या संघास २ लाख रुपये रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी, तर उपविजेत्या संघास १ लाख रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात येईल.

संघांच्या कामगिरीनुसार इन्सेंटिव्ह

जळगाव कोगटा किंग्ज, रावेर रॉयल्स, जामनेर सातपुडा हिरोज, अमळनेर सुहांस जायंट, पाचोरा एसकेटी योद्धाज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स या सहा संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लिगच्या प्रत्येक संघाला त्या त्या संघांच्या कामगिरीनुसार इन्सेटिंव्ह रक्कम रोख पारितोषीक स्वरूपात मिळेल. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून प्रत्येक संघाला प्रोत्साहन मिळावे म्हणून इन्सेंटिव्ह रक्कम जाहिर केली आहे. जेणे करुन संघाला काहीनाकाही मिळेल.

एलिमिनेटर च्या सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेच्या जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर एलिमिनेटर चा सामना अत्यंत चुरशीचा झाला. यात अवघ्या दोन धावांनी जामनेर सातपुडा हिरोज ने विजयाची मोहर उमटवली. या विजयासह क्लालिफायर दोन मध्ये जळगाव कोगटा किंग्ज संघासोबत ग्रॅण्ड फायनल साठी त्यांची लढत रात्री रंगणार आहे. एलिमिनेटरच्या सामन्यासाठी वर्धमान हॉस्पीटलचे संचालक डॉ. सुनिल नाहटा यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकून जामनेरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. जामनेरच्या डावाची सुरवात डगमगत झाली. २२ धावांवर पहिली विकेट पडली. त्यानंतर ठराविक अंतराने  ३५, ४६ व ७२ धावांवर गडी बाद होत राहिले. संघ सतत दडपणाखाली असताना राम राठोड, माणस पाटील, क्रीषी नाथानी यांनी डावाला आकार दिला व जामनेर सातपुडा हिरोज् संघाने २० षटकांत ८ बाद १५० धावा केल्यात. यामध्ये रामकृष्ण राठोडने जबाबदारी खेळी करत २३ चेंडूत नाबाद ३४ धावा फटकावल्या. जामनेर सातपुडा हिरोजच्या डावात ८ गडी १२१ धावांत बाद झाले असताना शेवटच्या फळीतील खेळाडूंनी केलेल्या छोट्या खेळींमुळे संघाला आव्हानात्मक धाव संख्या उभारता आली.

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाकडून कार्तिक बाटुंगेने ३ षटकांत १७ धावांत २ बळी घेतले. अभि पाटीलने २ षटकांत १४ धावांत २ गडी बाद केले. अमेय कोळी, ओम मुंडे, लोकेश पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. प्रत्युत्तरात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने संयमी खेळ दाखवित सुरवातीपासून सामन्यावर पकड मिळवली. एक बाजूने ठरावीक अंतराने बळी जात असताना कर्णधार ओम मुंडेने नाबाद राहत ६० चेंडूत ७ चौकार, १ षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. मात्र साहिल गायकर, प्रशांत ढोले भोपळाही न फोडता तंबूत परतल्याने सामना जामनेर सातपुडा हिरोजच्या बाजूने झुकला. जामनेर सातपुडा हिरोज् चे गोलंदाज ललित पाटील ने २ तर शतायू कुलकर्णी, अर्शद खान, राम राठोड, नितलेश चौधरी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. चुरशीच्या खेळीत चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सला ६ गडींच्या मोबदल्यात २० षटकात १४८ धावांवर रोखले. जामनेर सातपुडा हिरोज् ने क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यासाठी प्रवेश मिळविला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

Next Post

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us