Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचा निर्णायक इशारा; 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार.Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी निर्णायक एल्गार,’चलो मुंबई’ पुन्हा एकदा
अंतरवाली सराटी | Maratha Reservation:
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक पार पडली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला गेला असून, पुन्हा एकदा “चलो मुंबई” ची हाक देण्यात आली आहे.(Latest news) येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये धडक देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.Maratha Reservation

आरक्षणासाठी अंतिम टप्प्यातील लढा
मनोज जरांगे पाटील(manoj jarange patil) म्हणाले की, “आता मागे हटायचं नाही, ही लढाई आरपारची आणि अंतिम असेल”. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडून, 29 ऑगस्ट रोजी मुंबई गाठायची आहे. “विजय मिळवायचा, त्याशिवाय परत फिरायचं नाही,” अशा शब्दांत त्यांनी समाजाला पुन्हा एकत्रित केलं आहे.(Latest news marathi)
4 कोटी मराठ्यांमध्ये 58 लाख नोंदी
जरांगे पाटील यांनी दावा केला की, “मराठा समाजातील 58 लाख नोंदी सापडल्या असून जवळपास 4 कोटी लोक आरक्षणाच्या पात्रतेत आहेत.” केवळ 7-8% लोक उरले असून, त्यांच्या न्यायासाठी ही शेवटची लढाई असल्याचे ते म्हणाले.Maratha Reservation
शासनाचे अधिकृत संकेस्थळ👇🏻
https://sjsa.maharashtra.gov.in/).
सर्वपक्षीय संपर्क आणि प्रणिती शिंदे यांची भेट
Maratha Reservation मनोज जरांगे यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांची भेट घेतली असून, सर्व पक्षांच्या नेत्यांना स्वतः फोन करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात येत असल्याची माहिती दिली. “मराठी आणि कुणबी एकच आहेत,” असा आग्रह त्यांनी पुन्हा केला आहे. (Latest news in marathi)

सरकारला स्पष्ट इशारा
जरांगे म्हणाले, “29 ऑगस्टच्या आत सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.” ते पुढे म्हणाले की, “29 ऑगस्ट रोजी मुंबईत पाच पट अधिक लोक जमतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी घ्यावी.”Maratha Reservation
निर्धार आणि आवाहन (Latest news in marathi)
“माघारी येणार नाही, मरण आलं तरी विजय घेऊनच येणार,” अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी निर्धार व्यक्त केला. मराठा समाजाने रणभूमीत उतरून आरक्षणासाठी शेवटचा निर्णायक लढा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.(Maratha Reservation)
मराठा आरक्षणासाठीची ही चळवळ आता निर्णायक वळणावर आली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी होणारी ‘चलो मुंबई’ मोहीम राज्य सरकारपुढील मोठे आव्हान ठरणार आहे. आता सरकारची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.(Maratha Reservation)
दरम्यान, “चलो मुंबई” हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झालं असून, सर्वदूर एकजूट होताना दिसत आहे. सोशल मीडिया पोस्ट्स, स्टेटस, व्हिडीओ आणि रील्समुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापू लागलं आहे.
आता महाराष्ट्रभर नजर लागली आहे 29 ऑगस्टच्या ऐतिहासिक मोर्च्यावर – जो मराठा समाजाच्या भवितव्याचा निर्णायक क्षण ठरू शकतो.

मनोज जरांगे पाटील यांचा लढा नेमका काय आहे?
मराठा समाजाला OBC (Maratha Reservation) आरक्षण मिळावे, हे मनोज जरांगे पाटील यांचे प्रमुख उद्दीष्ट आहे. विशेषतः, मराठा समाजातील ‘कुणबी’ असल्याचे पुरावे (नोंदी) असलेल्या व्यक्तींना OBC अंतर्गत आरक्षण मिळावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.(Maratha Reservation)
लढ्याची पार्श्वभूमी:
1. कुणबी नोंदीचा प्रश्न:
राज्य सरकारने असं सांगितलं की जर मराठा समाजाने आपल्या कुळाच्या कुठल्याही सरकारी दस्ताऐवजावर “कुणबी” अशी नोंद दाखवली, तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल.पण प्रत्यक्षात अनेक पात्र लोकांना प्रमाणपत्र दिलं जात नाही, असं जारंगे म्हणतात.

2. समानता आणि ऐतिहासिक अन्याय:
जरांगे यांचं म्हणणं आहे की, मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक मुळांमध्ये काही फरक नाही. त्यामुळे सरकारने हा भेदभाव न करता सर्व मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं.
3. सरकारकडून वेळकाढूपणा:
जारंगे यांचा आरोप आहे की, सरकार मुद्दाम वेळकाढूपणा करत आहे आणि आरक्षणाचं धोरण राबवण्यात प्रामाणिक नाही.
प्रमुख मागण्या:
1. सर्व मराठा समाजाला OBC आरक्षणात समाविष्ट करा.
2. 58 लाख नोंदींचा आधार मानून OBC प्रमाणपत्र तात्काळ द्या.
3. मराठा = कुणबी याचा स्पष्ट GR (शासन निर्णय) काढा.
4. राजकीय पक्षांनी निवडणुकीपुरता नव्हे, तर स्थायीत्व असलेली आरक्षण धोरण घ्या.
आंदोलनाची दिशा:
2023 पासून जारंगे यांनी अनेकदा उपोषण, रस्त्यावर उतरून मोर्चे, पदयात्रा इ. स्वरूपात आंदोलन केलं.आता त्यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’ आंदोलनाची घोषणा केली आहे – 29 ऑगस्ट 2025 रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडक देणार आहे.
हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Amazon Prime Day Sale 2025: अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ सुरू; स्मार्टफोन, लॅपटॉप्स, एसीवर
50% ते 65% पर्यंत सूट
Heavy Rain Alert ; पुढील सात दिवस अतिवृष्टीचा इशारा,नागरिकांनी सतर्क राहावे!
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!
AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता
What is BTS? : BTS म्हणजे काय?
ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय
ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi
Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर
Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या
ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल