रायगड ! ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून महावितरणच्या इंजिनिअर तरुणीने आत्महत्या केली. अभिलाषा शेळके असे मृत तरुणीचे नाव आहे. अभिलाषा ही दक्षिण रायगडमधील गोरेगाव येथील महावितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होती.
शुक्रवारी (१९ मे) सायंकाळच्या सुमारास अभिलाषाचा मृतदेह महावितरण कंपनीच्या रहिवाशी वसाहतीमधील घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अभिषालाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे पण वाचाच..
उकाड्यापासून मिळणार दिलासा! हवामान खात्याने दिला हा मोठा इशारा
४ गावठी कट्टे, तलवारी, चोपरचा शस्त्रसाठा जप्त; पोलिसांच्या कारवाईने जळगावात खळबळ
नागपूरमधील ‘या’ बँकेत “लिपिक” पदासाठी बंपर भरती ; त्वरित करा अर्ज
मात्र, नेमकी तिने असं कठोर पाऊल का उचललं याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पोलिसांनी अभिलाषाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.