Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीत असलो तरी गल्लीतल्य समस्या विसरणार नाही — खासदार उन्मेष पाटील

najarkaid live by najarkaid live
June 16, 2019
in जळगाव
0
दिल्लीत असलो तरी गल्लीतल्य समस्या विसरणार नाही — खासदार उन्मेष पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

नगरपालिकेच्या वतीने जंगी सत्कार ; ढोल ताशांच्या गजरात दणाणले पालिका सभागृह
चाळीसगांव – शहरवासीयांच्या सेवेसाठी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भुयारी गटार योजना तसेच समांतर पाणी पुरवठा योजना अशा तीन महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचा आनंद आहे. नदी पात्राचे सुशोभीकरण असो वा केकी मुस कला दालन ची भव्य ईमारत एकापेक्षा एक प्रकल्प पूर्ण केले. त्याचप्रमाणे पालिकेतील पावणे दोनशे रोजंदारी कर्मचारी कायम केले.

या विकासाच्या कामामुळे शहराने भरभरून प्रेम दिले. ही विकासाची कामे करतांना पालिका अधिकारी ,कर्मचारी, नगरसेवक,सभापती, नगराध्यक्ष यांच्या सहकार्यातून  शहराचा कायापालट होणार आहे. आपल्या सर्वांशी एक भावनिक नाते तयार झाले. त्यामुळे तुमच्या समस्या,अडी अडचणी सोडविण्यासाठी दिल्लीत असलो तरी गल्लीतल्या समस्या विसरणार नाही अशी ग्वाही जळगांव लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. आज पालिकेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत
मानोरकर यांच्या वतीने नगरसेवक व पालिका कर्मचारी यांनी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर पालिकेचे गटनेते संजय पाटील , शिवसेनेचे तालुकप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख तथा नगरसेवक नानाभाऊ कुमावत, ज्येष्ठ नेते विश्वासराव चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पालिकेच्या आरोग्य ,पाणीपुरवठा ,आस्थापना, घरपट्टी, पाणीपट्टी ,सफाई कामगार या सर्व विभागांच्या वतीने खासदार उन्मेष पाटील यांचा सत्कार करण्यात आला कर्मचारी युनियन च्या वतीने अध्यक्ष तथा अभियंता राजेंद्र पाटील यांनी खासदार महोदय यांचा सत्कार केला यावेळी पालिकेतील कर्मचारी भारावले होते सुरुवातीला पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी खासदार उमेश पाटील यांच्या कामकाज पद्धतीविषयी समाधान व्यक्त करत समस्येच्या जाण असलेले व त्या सोडविण्याची तळमळ असलेले व्यक्तिमत्व आणि विनम्र स्वभावामुळे उन्मेश पाटील यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची सांगड घालून विकासाचा आलेख चढता ठेवण्यात त्यांचा हातखंडा असून त्यांच्यासोबत काम करण्यास मिळाले याचा आनंद आहे. नगराध्यक्षा आशातला चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की अडीच वर्षांपूर्वी आमदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि ही ऐतिहासिक कामगिरी त्यांनी आमदार  म्हणून केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्हाला मिळाली  त्यांनी आजवर शहरांमध्ये विकासाची गंगा आणली असून आज खासदार झाल्याने विक्रमी मतांनी दिल्ली काबीज केली आहे जनतेने भरभरून प्रेम दिल्याने उन्मेष पाटील यांचा राज्यात गौरव होत असल्याचा आम्हाला आभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. गटनेते संजय पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांची लवकरात लवकर मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार , चिराग शेख, बापूसाहेब आहिरे, प्रभाकर चौधरी, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, संगीता गवळी, भास्कर पाटील, सदाशिव गवळी पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटील, दिगंबर वाघ, संजय आहीरे, अमोल चौधरी,   माधव कुटे , दीपक देशमुख, विजय खरात, भूषण लाटे, किरण निकम, संजय गोयर , आहिरारव,सुर्यवंशी , बंडू पगार, निलेश गायके गौरव पुरकर, कल्पेश महाले, शेषराव चव्हाण , युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय  मराठे, गणेश महाले  यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख  कर्मचारी, सफाई कर्मचारी, मुकादम कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन नगरसेविका संगीता गवळी यांनी तर आभार ज्येष्ठ नेते विश्वासराव चव्हाण यांनी मानले.

भुयारी गटार योजनेमुळे डास मुक्त शहर

पालिकेचे सफाई कर्मचारी यांचे माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पाय धुवून संवेदना प्रकट केली मी देखील आज पाच जेष्ठ महिला सफाई कामगारांचे आशीर्वाद घेतले आहेत.चाळीसगांव शहरात भुयारी गटार योजने मुळे उघडी गटार संकल्पना नाहीशी होणार असून शहर डास मुक्त होणार आहे. येत्या काळात अधिक जोमाने काम करून शहराचा अपेक्षित कायपालट करण्यासाठी मी कटिबद्ध असून पालिकेच्या कर्मचारी अधिकारी नगरसेवक यांनी हातात हात घालून  जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू या असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून  तरुण वर्गाचा एक नवा संकल्प 

Next Post

उमंग महिला परिवारातर्फे “जागर पाण्याचा, ध्यास निसर्गाच्या रक्षणाचा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
उमंग महिला परिवारातर्फे “जागर पाण्याचा, ध्यास निसर्गाच्या रक्षणाचा

उमंग महिला परिवारातर्फे “जागर पाण्याचा, ध्यास निसर्गाच्या रक्षणाचा

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us