मुंबईः- देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी हे धोक्याने बनवलेले सरकार आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही. त्यामुळे या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही, व हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी पक्षातील २२ आमदारांचा एक गट फोडून भाजपाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. हे सरकार बहुमत सिद्ध करताना टिकणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.















