मुंबई- राज्यातील सत्तापेच अखेर सुटला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सर्व संमती झाली असून उद्या संयुक्त पत्रकार घेऊन तसं जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात राज्यातील राष्ट्रपती राजवट उठणार असल्याचं स्पष्ट आहे.















