वर्धा : राज्यात महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आता एक धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका 13 वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर आश्रम शाळेतील अधीक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे.
या मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिचे वडील तिला चंद्रपूरहून घरी हिंगणघाट येथे घेऊन आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. याप्रकरणी वर्ध्यातील हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास केला जात असून रविवारी याबाबत तक्रार दाखल करम्यात आली होती. आश्रम शाळेतील अधीक्षकाने केलेल्या संतापजनक कृत्यामुळे चंद्रपूरसह वर्ध्यातील हिंगणघाटमध्येही खळबळ माजलीय.
संशयिताविरोधात गुन्हा
आठवीमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळामा फासला. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर उघडकीस आले. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या आश्रम शाळेतील अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (53) याच्या विरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
TET घोटाळ्यात राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आल्याने खळबळ
‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ ; खडसेंचा गिरीश महाजनांना इशारा
देशातील टॉप बड्या बँकांमध्ये मेगा भरती ; पदवी पास असाल तर संधी सोडू नका
5 दिवस धोक्याचेच..! राज्यात कशी राहणार स्थिती..? जाणून घ्या
पीडितेचे आई-वडील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ते दोघेही दोन महिन्यांपूर्वी हिंगणघाट येथे राहायला आलेत. मुलीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर पीडितेच्या वडिलांनी आश्रम शाळा गाठली. शिवाय मुलीला हिंगणघाट येथे आणले. त्यानंतर मुलीच्या पोटाखाली दुखत असल्याचे तिने शेजारील महिलेला सांगिल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला.