मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ४० हुन अधिक जास्त आमदार आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे.
राज्यात आठ कॅबिनेट (cabinet) मंत्रिपदं आणि पाच राज्यमंत्रिपदं शिंदे गटाला देण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या शिवाय केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपदं दिलं जातील, असं बोललं जातंय.
हे पण वाचा :
उद्धव ठाकरे नव्या अडचणीत ! या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगावकरांनो सावधान ! अन्यथा घडू शकते तुमच्यासोबत असे, वाचा ही बातमी
मुंबईला निघालो सांगून थेट गुवाहाटीकडे रवाना ; जळगावच्या आणखी एक आमदाराची शिंदेंना साथ
.. तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार ; उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन
एकनाथ शिंदे गटाचा विचार केल्यास, शिंदे यांच्याकडे 41 आमदार आणि सहा अपक्ष असे एकूण 47 आमदारांचं संख्याबळ असल्याचं बोललं जातंय. तर एकीकडे भाजपकडून शिंदेंना मंत्रीपदाची ऑफर दिली जातेय. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक विधान केलंय. हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे.