नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीमुळे आज बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. नव्या दरानुसार आज बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 0.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर घसरणीसह 49,150 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहेत. चांदीचे भाव देखील कमी झाले असून, आज चांदीचे दर प्रति किलो 69,300 रुपयांवर पोहोचले आहेत.
राज्यातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार राजधानी मुंबईमध्ये आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 49,150 रुपये प्रति तोळा आहे, तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत. जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,990 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49,180 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्यासाठी प्रति तोळ्यामागे 53,650 रुपये मोजावे लागत आहेत. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49 300 असून, 24 कॅरट सोन्याचा दर हा 53 हजार आठशे रुपये एवढा आहे तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर हा प्रति तोळा 49200 असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत.
जागतिक कमाॅडिटी बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १९७६.४६ डॉलर प्रती औंस इतका आहे. त्यात ०.१ टक्के घसरण झाली. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव १९८१ डाॅलर प्रती औंस इतका आहे. चांदीचा भाव २५.८७ डॉलर प्रती औंस इतका आहे.