मुंबई, दि 16 – महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत देखील केंद्रीय समितीने नोंदविले आहे.
याबाबत केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठविलेले आहे. केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर ठोस पावले उचलली जात नसून रात्रीच्या संचारबंदीचा कोरोना प्रसारावर ठोस परीणाम होत नसल्याच म्हटलं आहे.
दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती कोरोना उत्पत्ती व प्रसाराचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोना प्रतिबंधक विषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतलेला होता.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात राज्यात वाढत्या कोरोना रूग्ण संख्येवरून दुसऱ्या लाटेची ही सुरूवात झाली असण्याची शक्यता असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये वाढत्या कोरोनासंदर्भात सूचित केलेले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली होती. राज्यात कोरोना बाधितांचा उच्चाक गाठत 15051 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 48 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.तसेच रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर आलेला आहे.
केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि टी वॉर्डमध्ये तसेच ठाणे, नाशिक, जळगाव , धुळे ,औरंगाबाद, याठिकाणी पाहणी केलेली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन-क्वारंटाईन फॅसिलिटीज ट्रीटमेंटची काय परिस्थिती आहे याचे निरीक्षण या पथकाने घेतले होते.00















