चाळीसगाव (प्रतिनिधी) – वाघळी पातोंडा जिल्हा परिषद गटात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे पावसाळ्यामध्ये संपूर्ण रोडची खडी उघडी पडून साधे पायी चालत येत नाही अशी अवस्था झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामध्ये विशेष करून चांभारडी ते जामडी, चांभारडी ते जावळ, जामडी ते एकलहरे, चांभारडी ते वाकडी, चांभारडी ते मुंदखेडा, चांभारडी ते वाघळी, वाघळी ते डाम्रुन, असे सर्व रस्ते खराब निकामी झाले आहेत संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी, यांनी लक्ष घालून वरील सर्व रस्ते त्वरित दुरूस्ती करावेत अशी मागणी प्रसिद्धी द्वारे तुकाराम रामभाऊ पाटील माजी सरपंच चांभारडी, शिवसेना उपतालुका प्रमुख चाळीसगाव यांनी केली आहे.















