Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध!

najarkaid live by najarkaid live
November 11, 2020
in राज्य
0
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध!
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे, दि. 11 : धुळे जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदनशील राहत ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

आयुक्त श्री. गमे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विश्व मानव रुहानी केंद्राच्या माध्यमातून ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत शिलाई मशीन व फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक माणिक भोसले, उपायुक्त अर्जुन चिखले (रोहयो), अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे आदींसह विविध‍ विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त श्री.गमे म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी प्रशासन आहे ही भावना रुजवायची आहे. या कुटुंबांना कृषी, ग्रामीण विकासासह विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. या महिलांना बचत गटाचे सदस्यत्व करून घ्यावे.

उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारावे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कुटुंबांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात. त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. ते आगामी काळातही त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

विश्व मानव रुहानी केंद्राच्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून 36 शिलाई मशीन आणि 26 फवारणी पंपांचे वितरण करण्यात येणार आहे, असे केंद्राचे सेवेकरी राजेंद्र आहुजा यांनी सांगितले. यावेळी केंद्राचे सेवेकरी उमेश चौधरी, सुमीत आहुजा आदी उपस्थित होते.

या कुटुंबांना मिळाला आधार : धुळे तालुका : सीमा भरत पाटील (निमडाळे), उमेश लक्ष्मण पाटील (बुरझड), राजेंद्र महादू बागूल (कुंडाणे). धुळे शहर : सुषमा राजेंद्र पाटील (फागणे), मनीषा राजेंद्र महाले (रावेर), उज्ज्वला कैलास पाटील (नगाव), विजया माधवराव सूर्यवंशी(फागणे), मनोहर आबा पाटील (गोंदूर), शोभाबाई नागराज पाटील (कुंडाणे), राहुल अरुण पाटील (बाळापूर).

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोष…

Next Post

दिलखुलास कार्यक्रम ; उद्या ‘या’ विषयावर परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची विशेष मुलाखत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
दिलखुलास कार्यक्रम ; उद्या ‘या’ विषयावर परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची विशेष मुलाखत

दिलखुलास कार्यक्रम ; उद्या 'या' विषयावर परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची विशेष मुलाखत

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us