Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ सुवर्णा दिलीप पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास… भाग -2

najarkaid by najarkaid
March 11, 2021
in जळगाव
0
डॉ.सुवर्णा दिलीप पाटील यांनी लिहलेला सुंदर लेख सुवर्ण जीवन प्रवास…
ADVERTISEMENT

Spread the love

आधीच सांगितले की योगा म्हणजे एक जीवन पद्धती आहे त्यामुळे याला काही नियम लागू होतात.
जेथे नियम तेथे संतुलन.

आत्मा रथिम विध्दी शरिर रथमेव तू | बुध्दी तू सारथी विध्दीमन प्रग्रहमेवच ||

भौतिक देहरूपी रथामध्ये आत्मा हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत.
याप्रमाणे आत्मा हा मन आणि इंद्रयांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो.

योगाच्या माध्यमातून ह्या आत्मपिडा कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे.
पतंजली ऋषींनी याचे आठ अंग सांगितले आहेत म्हणून याला अष्टांग योग असे म्हणतात.
यम ,नियम ,आसन ,प्राणायाम, प्रत्याहार ,धारना, ध्यान आणि समाधी.

१)यम: ताबा असणे. ज्यात भावनांचा उद्रेक होत नाही. एक आदर्श वाद.

२)नियम:स्वतःच्या आरोग्यासाठी शारीरिक असो वा मानसिक असो काही नियम पाळणे गरजेचे असतात. जसे सकाळी लवकर उठणे नियमित व्यायाम करणे असे बरेच काही.

३)आसने:शरीराची लयबद्ध हालचाल म्हणजे व्यायाम होय. ज्याला आपण आसन म्हणू. ज्याने शरीराची लवचिकता आणि ताकद वाढते. शरीरातील सर्व घटकांचे संस्थांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आसने गरजेचे आहे.

४)प्राणायाम:प्राणवायू ला शरीरात विनाअडथळा प्रवेश करता यावा व शरीराच्या अनुरेणू पर्यंत त्याचे सहज वहन व्हावे. ज्यामुळे प्रत्येक घटक हा पुनर्जीवित होत राहील. त्यासाठी करावयाची क्रिया म्हणजे प्राणायाम होय. ज्यामुळे शरीराचे आंतरिक शुद्धीकरण होते.

५ प्रत्याहार:प्रत्याहार म्हणजे विरक्त राहणे. जे जे आपल्यासाठी अयोग्य आहे म्हणजे आयोग्य आहार, अयोग्य संगत, अयोग्य शब्द यापासून माणसाने विरक्त राहणेच योग्य असते. ज्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. वाईट आणि दुष्ट प्रवृत्ती पासून आपण जर विरक्त राहिलो तर आपली प्रगती सतत होत राहते.

६) धारना:पाहिले पाच अंग हे बहीर्अंग होय. ह्या पाच बहिर्अंगाच्या सहायाने शरीराला पुढील क्रियांसाठी तयार करणे. धारना एकाग्रता. ही एकाग्रता मिळवण्यासाठी आधी शरीराची तशी धारना करणे गरजेचे असते. कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचे सार सांगत होते. मानवी जीवनाचा उद्देश सांगत होते. अर्थात भगवद्गीतेचे ज्ञान देत होते. त्यावेळेस गीतेच्या सोळाव्या अध्यायात त्यांनी योगाचे महत्त्व सांगितले. ध्यान धारना याचे महत्त्व सांगितले.
तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला, “ कृष्णा, तू सांगतो की योगा म्हणजे आपल्या आत्माच ब्रम्हाशी जुळणे होय. परंतु हे कायमस्वरूपी कसे काय राहू शकते? कारण माणसाचं मन किती अस्वस्थ, चंचल, अस्थिर आहे. वाऱ्या सारखं बेभान आहे. अशा मनाला कसे काय स्थिरत्व देता येईल. असे मन कसे एकाग्र होईल.?”
भगवान श्रीकृष्ण ,’हे पार्था मान्य आहे मन हे अस्वस्थ, अस्थिर आहे त्यावर ताबा मिळविणे अवघड आहे परंतु अशक्य नाही योगाच्या निरंतर अभ्यासाने त्याला स्थिर करता येऊ शकते.”

हा निरंतर अभ्यास म्हणजेच बहिर्अंगांचा अभ्यास आणि त्यानंतर धारना या स्थितीत येणे.

7) ध्यान:तल्लीनता . तल्लीन होणे. एकदा का शरीर धारणेसाठी तयार झाले की मन ध्यानस्थ होते तल्लीन होते. मनाची एकाग्रता वाढत गेली की आपण आपोआपच तल्लीन होऊन जातो. त्याच स्थितीत राहतो आजूबाजूचे भान आपल्याला राहत नाही बाहेरची कोणतीच शक्ती आपल्याला विचलित करू शकत नाही आणि ह्या स्थितीत आपला आत्मा आपल्या शरीराचे आतून परीक्षण करीत असतो.

८) समाधी:पतंजली योग सूत्राची हे शेवटचे अंग होय. समाधी म्हणजे विलीन होणे. आपली आंतरिक ताकत ही ब्रम्हांडाचा ताकदीशी विलीन होते आणि यावेळेस आत्मा आपल्या शरीराचे परीक्षण बाहेरून करतो त्रयस्थ म्हणून करीत असतो.

ज्या वेळेस ही ताकद ब्रह्मांडाच्या ताकदी सोबत विलीन होते. त्यावेळेस शरीराचा मेटॅबोलिक रेट हा खूप कमी होतो आणि त्यावेळेस सेल डिव्हिजन असेल ,शरीरातली चयापचयाची क्रिया असेल ही पण खूपच मंदावते. त्यामुळेच आपल्याला माहित आहे की ऋषी मुनि हे वर्षानुवर्ष समाधी अवस्थेत असायचे आणि तरुणच असायचे. कारण या समाधि अवस्थेमध्ये शरीरातील पेशींचं सेल डिव्हीजन हळू होते.

टिअर एन विअर ही क्रिया मंदावते आणि त्यामुळे भुक तहान या भावना सुद्धा होत नाहीत. कारण की तुमची एवढी एनर्जी सेल डिव्हिजन मध्ये रेगुलरली जाते तेवढी ह्या समाधीअवस्थेमध्ये जात नाही. जर क्रियाच मंदावली जाईल तर ती क्रिया करण्यासाठी लागणारी ताकद सुद्धा ही कमी लागते. म्हणून भूक आणि तहान आणि नैसर्गिक क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळेच हे ऋषी-मुनी वर्षानुवर्ष काहीही न खाता-पिता एकाच अवस्थेमध्ये बसून राहायचे त्याला आपण समाधी म्हणतो.

आजच्या काळामध्ये हे आपल्याला शक्य नाही किंवा आपला त्यावर विश्वासही बसत नाही. परंतु समाधि अवस्थेमध्ये काही काळ आपण बसू शकतो. जर नित्य यत्न केला तर आणि ह्या काळामध्ये आपण आपल्या आजूबाजूचं सुख दुःख, आवड-निवड, हेवेदावे, मत्सर या सर्व गोष्टींपासून काही काळ का असेना मुक्त होतो आणि हेच खरे आरोग्याचे गमक आहे.

समाधीचा अर्थच तो आहे. आनंद आणि दुःख यापासून अलिप्त राहणे. फ्री फ्रॉम पेन अँड प्लेजर.

आचरण दुसरे—झोपण्यापूर्वी एक किंवा अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे.
विश्लेषण— रात्रीच्या जेवणानंतर आपली शारीरिक हालचाल कमी होते त्यामुळे जेवणात असलेले तेल, तूप पदार्थ रक्तामध्ये शोषण्याचे प्रमाण जास्त होते. हा तेलकट भाग शरीरात कमी शोषला* *जावा व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवू नये व लवकर बाहेर निघावा यासाठी हे कोमट पाणी मदत करते. तसेच रक्‍ताभिसरण सुरळीत करते.

*क्रमशः*

*डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील भडगाव*

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव, चोपडा नगरपालिका क्षेत्रात दोन दिवसाचे निर्बंध जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले जाहीर

Next Post

आज जिल्हयात 954 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 6 रुग्णांचा मृत्यू

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या ‘परदेशी स्ट्रेन’ बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…

आज जिल्हयात 954 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 6 रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us