Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ नियुक्त ; २० रोजी सुनावणी

najarkaid by najarkaid
July 18, 2022
in राष्ट्रीय
0
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ नियुक्त ; २० रोजी सुनावणी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाने सुनावणी तात्काळ घेण्यास नकार दिला होता आणि खंडपीठ स्थापन कराव लागेल असं सांगण्यात आलं होतं मात्र आता सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ नियुक्त करण्यात आले असून आता बुधवार २० जुलै रोजी ही सुनावणी होणार आहे.

खंडपिठात या न्यायमूर्तींचा आहे समावेश…

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असणार आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून करण्यात आली होती. सुरुवातीला १६आमदार आणि त्यानंतर पक्षाचा व्हीप न पाळनाऱ्या ३९ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रतोद सुनील प्रभू आणि शिवसेना गटनेते अजय चौधरी यांच्याकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली.याविषयी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बंडखोरांकडूनही याचिका दाखल करण्यात आली असून ११जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी होणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले होते.

या सुनावणीकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, शिंदे-फडणवीस सरकारची वैधता, विधिमंडळात शिवसेनेचा खरा दावेदार कोण आदी गोष्टींचा फैसला बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत होणार आहे.

शिंदे सरकारला राज्यपालांनी सरकार स्थापनेची परवानगी देणे, विधानसभा अध्यक्षांची निवड, सरकारचा बहुमताचा ठराव आदी बाबींना शिवसेनेने चार याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई, मुख्य प्रतोद सुनील प्रभू आदींनी या याचिका दाखल केल्या आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. या कारवाईविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व  बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात जोपर्यंत उपाध्यक्ष झिरवळ यांच्याविरोधातील तक्रारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमदारांवरील कारवाई रोखण्याची मागणी करण्यात आली होती. २७ जूनला न्यायमूर्ती सूर्यकांत व जे. बी. पारडीवाला यांनी बंडखोर आमदारांना उपाध्यक्षांच्या नोटीसवर उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली होती. आता यावर २० जुलैला सुनावणी होणार आहे.

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या दिलेल्या निर्देशांना आव्हान दिले होते. २९ जूनला सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली. यावरदेखील सुनावणी होणार आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाली. यावेळी प्रतोद सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांकडून बजावण्यात आलेल्या व्हीपला आव्हान दिले. व्हीप न पाळणाऱया आमदारांवर कारवाईची मागणी अध्यक्ष तसेच सर्वोच्च न्यायालयाकडे केली.

राज्यपालांकडून एकनाथ शिंदेंना सत्तास्थापनेसाठी बहुमत चाचणी घेण्याच्या निर्णयाला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात देसाई यांनी ३ जुलै ते ४ जुलैदरम्यान विधिमंडळात झालेल्या अध्यक्षांची निवड व बहुमत चाचणी हे सर्व बेकायदेशीर ठरवण्याची मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती

Next Post

आज पासून सर्वसामान्यांना झटका ; ‘या’ वस्तू महागल्या… जाणून घ्या काय झाले महाग…

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आज पासून सर्वसामान्यांना झटका ; ‘या’ वस्तू महागल्या… जाणून घ्या काय झाले महाग…

आज पासून सर्वसामान्यांना झटका ; 'या' वस्तू महागल्या... जाणून घ्या काय झाले महाग...

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us