नवी दिल्ली : भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला व संविधान निर्मितीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला आदरांजली वाहिली.















