Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, हवं तर इस्रायलमध्ये जा; फडणवीस भडकले

najarkaid by najarkaid
January 24, 2020
in राज्य, राजकारण
0
ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, हवं तर इस्रायलमध्ये जा; फडणवीस भडकले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  भाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग  झाल्याच्या आरोपाचं माजी मुख्यमंत्री फडणवीस  यांनी जोरदार खंडन केलं आहे. ‘राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे. 

मागील सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. गृह खात्यानं सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचं ठरविलं आहे. या संपूर्ण प्रकरणावरून सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी भाजपला धारेवर धरलं आहे. फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर, फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘राज्य सरकारनं तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. जे आरोप करताहेत, त्यांची विश्वासार्हता किती आहे हे त्यांनाही माहीत आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही आपली संस्कृती नाही. तरीही सरकारला चौकशी करायची असेल तर ती तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा. महाराष्ट्राच्या जनतेला सत्य माहीत आहे. आमच्या सरकारमध्ये गृहराज्य मंत्री खुद्द शिवसेनेचेच होते,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फोन टॅपिंगसाठी व व्हॉट्सअॅप मेसेज अनधिकृतरित्या पाहण्यासाठी इस्रायली कंपनीकडून ‘पेगॅसस’ ही प्रणाली विकत घेण्यात आली होती. त्यासाठी काही अधिकारी इस्रायलला गेल्याचा आरोप होता. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘इस्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर सरकारनं करावी,’ असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अय्यरने करून दाखवले; भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय

Next Post

बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढं घेऊन जाऊ शकतात

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढं घेऊन जाऊ शकतात

बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढं घेऊन जाऊ शकतात

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us