Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अय्यरने करून दाखवले; भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय

najarkaid by najarkaid
January 24, 2020
in क्रीडा
0
अय्यरने करून दाखवले; भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय
ADVERTISEMENT

Spread the love

ऑकलंड –  श्रेयस अय्यरच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने २०३ धावा केल्या होत्या. 

विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. हिटमॅन रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागिदारी केली. ही जोडी संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच राहुल ५७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली देखील ४५ धावावर माघारी परतला. या दोन विकेटमुळे भारताची अवस्था ३ बाद १२१ अशी झाली.

शिवम दुबेने काही आक्रमक शॉट खेळले. पण त्याला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो १३ धावा करून बाद झाला. त्याआधी कॉलिन मुन्रो आणि मार्टिन गप्टिल यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या षटकापासून आक्रमक खेल सुरू केला. पहिल्या ५ षटकात न्यूझीलंडच्या ५० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडची ही जोडी शतकाकडे वाटचाल करत असताना शिवम दुबेच्या चेंडूवर रोहित शर्माने गप्टिलचा सीमा रेषेवर शानदार कॅच घेतला आणि टीम इंडियाला पहिला ब्रेक मिळाला.

त्यानंतर मुन्रोने अर्धशतक पूर्ण केले. पण शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने ५९ धावा केल्या. मुन्रो बाद झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात जडेजाने कॉलिन डी ग्रँडहोमला शून्यावर बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. ग्रँडहोमच्या जागी आलेल्या रॉस टेलर आणि कर्णधार केन विल्यम्सन भारतीय गोलंदाजावर तुटून पडले. विल्यम्सनने २५ चेंडूत अर्धशतक केले. पण अर्धशतक झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याला चहलने बाद केले.

टीम सेफर्टला जसप्रीत बुमहारने १ धावावर बाद करून न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. अखेरच्या षटकात रॉस टेलरने टी-२०मधील अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद ५४ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महावितरण कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘विरंगुळा’चे आयोजन

Next Post

ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, हवं तर इस्रायलमध्ये जा; फडणवीस भडकले

Related Posts

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
Next Post
ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, हवं तर इस्रायलमध्ये जा; फडणवीस भडकले

ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, हवं तर इस्रायलमध्ये जा; फडणवीस भडकले

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us