Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची एकाच छताखाली पर्वणी : डॉ. सुरेश पाटील

najarkaid by najarkaid
November 21, 2026
in जळगाव
0
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन आणि प्रगत कृषी पद्धतींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ॲग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, दि. २० रोजी शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शेतकऱ्यांसोबतच कृषीपूरक उद्योगांमध्ये संधी शोधणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांनीही प्रदर्शनाला भेट देत विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

देशभरातील कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे काम ॲग्रोवर्ल्डच्या माध्यमातून होत आहे. शेतीविषयक ज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी असे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील उद्योगांना एकाच वेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची तसेच उत्पादनांची माहिती देण्याची संधी मिळते, असे मत निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन निर्मल सिडसचे डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पाटील बायोटेकचे प्रमोद पाटील, मेट्रोज बाायोटेकचे प्रियंक शहा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, हिरा रोटोचे भुषण खडके, मेट्रोजन बायोटेकचे युवराज वाला, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.

ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात २२० पेक्षा अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन मोफत आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा लहान मोठ्या कृषी यंत्र व औजारांचे तब्बल ४० स्टॉल्स आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकऱ्यांनीची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. ॲग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे १२ वे प्रदर्शन आहे

शेतीकामासाठी मजुरांची कमतरता भासत असल्याने त्यावर पर्याय म्हणून फवारणीसाठी ड्रोन, विविध प्रकारची कृषी यंत्रे आणि आधुनिक औजारांचे प्रात्यक्षिक व माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. कमी पाण्यात, कमी श्रमात अधिक उत्पादन घेण्यास मदत करणारे तंत्रज्ञान, विविध पिकांमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, टिश्यूकल्चर केळीच्या १२ हून अधिक कंपन्या, फळे व भाजीपाला नर्सरी, सुधारित बियाण्यांचे आधुनिक वाण आणि नॅनो फर्टिलायझर यांचा समावेश आहे. याशिवाय शेततळ्यांचे अस्तरीकरण, सोलर फार्मिंग, शेततार कुंपण, झटका मशीन, किचन गार्डन टूल्स, परसबाग व टेरेस गार्डनसाठी विविध रोपे यांची माहितीही मिळणार आहे. शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा, शासकीय योजना, कृषी विभागाचे अनुदान आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध होत आहे.

ॲग्री स्टार्टअपच्या स्टॉलवर गर्दीदरम्यान होणाऱ्या प्रदर्शनात ॲग्री स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, फळे आणि भाजीपाला सोलर ड्रायर मशीन, पापड उद्योग प्रमुख आकर्षण आहे. पहिल्याच दिवशी उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी हे स्टॉल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. याशिवाय प्रदर्शनात नवतंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग शेतमजुरीला पर्याय ठरतील, असे ड्रोन व लहान-मोठे शेती यंत्र व औजारांवर पाहण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आधुनिक कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ­ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

दुष्काळी स्थितीतही उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान : प्रमोद पाटील

यंदा दुष्काळी परिस्थिती असली, तरी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून शेतीतून अधिक उत्पादन कसे घेता येईल, यावर प्रदर्शनातील विविध स्टॉलच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. देशभरातील कंपन्यांसह राज्यातील नामांकित कृषी कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे. विशेषत: केळी, पपई, हळद आणि कांदा या पिकांचे दुष्काळी परिस्थितीतही चांगले उत्पादन घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे. पाटील बायोटेकनेही लागवडीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे प्रमोद पाटील यांनी केले.

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनकरतांना निर्मल सिडसचे डॉ. सुरेश पाटील, पाटील बायोटेकचे प्रमोद पाटील, मेट्रोज बाायोटेकचे प्रियंक शहा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, हिरा रोटोचे भुषण खडके, मेट्रोजन बायोटेकचे युवराज वाला, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण….

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

Related Posts

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us