Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.सुवर्णा दिलीप पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास भाग -३

najarkaid by najarkaid
March 13, 2021
in जळगाव
0
डॉ.सुवर्णा दिलीप पाटील यांनी लिहलेला सुंदर लेख सुवर्ण जीवन प्रवास…
ADVERTISEMENT

Spread the love

घेरंड संहिते मध्ये शरीर म्हणजे एक घट होय असे सांगितले आहे. घट (मटका) .जसे शरीर हे पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे पृथ्वी, जल, अग्नी ,वायु आणि आकाश.तसाच हा घटही पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे.

ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू ह्या पंचमहाभूतांपासूनच तयार झालेली आहे. मग तो घट असो किंवा माणूस असो.

घट तयार करताना पृथ्वी (माती) आणि जल एकत्र आले त्याला आकार दिला. तो आकार देण्यासाठी आकाश उपलब्ध होते. म्हणजे स्पेस जर जागाच नसेल, आकाशच नसेल तर मातीच्या गोळ्याला आकार देणे शक्य नाही.
वायूने त्याला हलके बनवले आणि त्याच्या पोकळीमध्ये सामावला आणि अग्नीने त्याचा ठिसूळपणा घालवला त्याला काठीण्य दिले.

ज्याप्रकारे हा घट तयार झाला आणि त्याला एक नवीन रूप मिळाले त्याच प्रमाणे हे पंचमहाभूत मानवालाही एक रूप देते.

जसे या घटाला इजा होण्यापासून, फुटण्या पासून जपायचे असते. तसेच शरीराला आणि मनालाही इजा होण्यापासून जपायची असते आणि ते साध्य करण्यासाठीचा मार्ग म्हणजेच योगा होय.

घेरंड संहितेत सात योग प्रक्रिया सांगितलेल्या आहेत.

१)ओढणा:ओढणा म्हणजे शरीराचे शुद्धीकरण होय. मग हे शुद्धीकरण पंचकर्माने केले जाते. स्नेहन ,स्वेदन, वमन, विरेचन आणि बस्ती.
आजच्या परिस्थितीचा आणि वेळेचा जर विचार केला तर हे नियमितपणे करणे आपल्याला अवघड होते. परंतु वर्षातून एकदा तरी शरीराचे शुद्धीकरण करावे.
हा शुद्धीकरणाचा काळा म्हणजे ग्रीष्म आणि वर्षा ऋतु चा संधिकाळ उत्तम शुद्धीकरणाचा काळ समजला जातो.
म्हणजे श्रावणाच्या सुरुवातीला.
श्रावण महिन्यामध्ये शरीरात पित्त प्रकोप जास्त असतो कारण की पाण्याची आम्लता म्हणजे पाण्याची ऍसिडिटी वाढलेली असते आणि तेच आपण घेत असतो. म्हणून आपल्या शरीरात पित्त प्रकोप होतो. पचनसंस्थेचे कार्य मंदावलेले असते.
त्यामुळेच आयुर्वेदात सांगितलेले आहे की श्रावण महिन्या मधला आहार अतिशय सौम्य आणि हलका असावा .म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये मासाहार बंद सांगितलेला आहे आणि मसाल्याचे पदार्थही. परंतु आपण नेमके उलटे करतो भजे, मसाले याकाळात जास्त खातो आणि आजाराला आमंत्रण देतो
हे पित्त बाहेर काढा काढण्यासाठी वमन, विरेचन, बस्ती पंचकर्म मधल्या या क्रिया कराव्यात.
ज्यांना रक्तपित्त असते त्यांनी रक्तमोक्षण करावे वर्षभर ह्या पित्ताचा त्रास होत नाही.

२)दृढता: सक्षम बनवणे. एकदा का शरीराचे शुद्धीकरण झाले की मग शरीराला सक्षम बनवणे सोपे जाते. शरीराची पचनक्रिया जर व्यवस्थित तर इतर संस्थांचेही कार्य व्यवस्थित चालते. हे शुद्धीकरण शरीराची आंतरिक सक्षमता वाढवते . जसे वास्तु बळकट राहण्यासाठी पाया पक्का करावा लागतो. तसेच आत्म्याची वास्तु म्हणजे आपले शरीरही आधी आतून बळकट करावे लागते.

३)स्थैर्य:- स्थैर्य मानसिक आणि शारीरिकही. आपण आधी बघितले की जेथे स्थिर मन तेथे स्थिर काया. आरोग्याचं संतुलन म्हणजेच मन आणि शरीर दोन्ही स्थिर हवे. चुकीच्या गोष्टींचा उगम हा अस्थिरतेतूनच होतो. सर्व शरीर हे स्वच्छ आणि सक्षम झाले की त्याला स्थैर्य लाभते आणि हे स्थैर्य म्हणजेच आरोग्य होय.

४) धैर्य:-शरीराला स्थैर्य लाभले की मनाचे धैर्य वाढते. आपले शरीर निरोगी राहिले की कुठलेही धैर्य करायला आपण निघतो. परंतु हेच एक रोगी करू शकतो का? नाही. कारण त्याच्या शारीरिक पिडेनेच तो एवढा त्रस्त असतो की कुठलेही धैर्य करायला तो धजत नाही. म्हणूनच मनाचे धैर्य वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक स्थिर शरीर हवे असते. आणि ते योगातूनच साध्य होते.

५)लघू:– योगाची महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे लघू. अर्थात हलकेपणा प्राप्त करणे होय. लघुत्व म्हणजे तरळता किंवा हलकेपणा. शरीराचे शुद्धीकरण झाले, शरीर सक्षम आणि स्थिर झाले, धैर्य प्राप्त झाले की आपोआपच शरीराची तरळता वाढते. शरीरात एक प्रकारचा हलकेपणा येतो आणि चपळपणा येतो.

६) प्रत्यक्षा:- म्हणजे सर्व संवेदनांवर ताबा मिळवणे होय. मग या संवेदना कोणत्या तर रात्री-अपरात्री जागरण करणे हीदेखील संवेदनाच आहे. भूक नसतानाही खाणे. पोट भरल्यावर सुद्धा भुकेची संवेदना होणे ही चुकीची संवेदना आहे. अशा चुकीच्या गोष्टींवर ताबा मिळवणे म्हणजेच प्रत्यक्षा.

७)निर्लिप्त:- घोडक्यांमध्ये राहूनही किंवा गर्दीतही राहूनही किंवा चुकीच्या संगतीत ही राहून आपण निर्लिप्त राहू शकतो. ते कसे काय? खूप सोपे आहे. जर मित्रांमध्ये एखाद्या व्यक्तीवर विनाकारण टीका केली जात असेल तर आपण त्यावर टीका करणे किंवा प्रतिक्रिया देणे टाळणे म्हणजेच निर्लिप्त राहणे होय.
आपण चुकीची संगत करत आहोत आणि वेळीच अशी संगत सोडणे म्हणजेच निर्लिप्त रहाणे. कामावरचा ताण तणाव घरात शिरण्यापूर्वी बाहेरच सोडून देणे आणि घरामध्ये एक फॅमिली मॅन बनूण हसत-खेळत वातावरण निर्माण करणे म्हणजे निर्लिप्त रहाणे होते. थोडक्यात कमळासारखे रहाणे.कमळ चिखलात उगवते परंतु स्वतःवर चिखल उडू देत नाही यालाच तर निर्लिप्तपणा म्हणतात.आज पासून आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे आपण निर्लेप मन ठेवूया. मग प्रगतीत आणि आनंदात अडथळा येत नाही आणि त्यामुळे आरोग्य नेहमीच छान राहते.

आचरण तिसरे:– रात्री कोमट पाण्यामध्ये आवळा चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण काचेच्या भांड्यात भिजत घालावे. सकाळी उठल्यावर गाळून ते पाणी प्यावे. ज्यांना सर्दी होते त्यांनी थोडे कोमट करून प्यावे. ज्यांचे दात आंबतात त्यांनी त्यावर पुन्हा कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.

विश्लेषण:– दिवसभर आणि रात्री जे अन्न आपण ग्रहण केलेले असते त्याचे पचन होऊन बरेच फ्री रॅडिकल्स (विषारी घटक) तयार झालेले असतात. जेवढे शरीरात फ्री रॅडिकल जास्त निर्माण होतील तेवढं वार्धक्य (म्हातारपण) लवकर येतं आणि शरीर लवकर क्षीण होतं.
मग हे फ्री रॅडिकल्स काढण्यासाठी त्रिफळा चूर्ण किंवा आवळा चूर्ण अतिशय उत्तम आहेत. यात विटामिन सी आहे आणि विटामिन सी नवीन सेल्स ला जनरेट करत असतात आणि फ्री रॅडिकल्स ला शरीरातून बाहेर काढत असता

डॉ.सुवर्णा दिलीप पाटील,भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एरंडोल नगरपालिका कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ दीड लाख रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात

Next Post

सौ.कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी निवड

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us