जळगाव,(प्रतिनिधी)- कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट बाराशे रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा ,विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाईकामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
सदर कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील श्री सुरज जगताप कृषी विकास अधिकारी ,श्री विजय पवार मोहीम अधिकारी ,श्री विकास बोरसे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक ,श्री धीरज बडे कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते .
कृषी विक्रेते यांनी जाता दराने विक्री केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी यांनी दिलेला असून शेतकऱ्यांनी ज्यादादाराने विक्री होत असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव,कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी.
शेतकरी बंधूंनी विशिष्ट वाणाच्या मागणी न करता विक्रेता यांच्याकडे उपलब्ध असलेले मान्यताप्राप्त वाण हे संकरित BG 2 प्रकारातील असून योग्य पिक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास चांगले उत्पादन येते.शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान पाहता कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी असे आवाहन कृषी विभागा कडून करण्यात आले.









