श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर या राज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी युरोपीय प्रतिनिधी मंडळाने जम्मू आणि काश्मीरचा दौरा केल्यानंतर आता या राज्यातील परिस्थिती कशी आहे याची पाहणी करण्यासाठी आणखी एक विदेशी प्रतिनिधी मंडळ श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. हे प्रतिनिधी मंडळ १२ आणि १३ फेब्रुवारीला प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, स्थानिक लोक, व्यापारी आणि राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार आहे.
भारत सरकारच्या आउटरिच कार्यक्रमांतर्गत हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये अनेक देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. हे प्रतिनिधी मंडळ जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला, श्रीनगर आणि जम्मूसारख्या भागांचा दौरा करेल. हे प्रतिनिधी मंडळ जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी भाग, युवक, धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर अनेक समुदायांच्या लोकांच्या भेटी घेणार आहे.














