जळगाव : जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा दीर्घकाळ विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने अखेर धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकावत तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी धुळे येथील हुजेफ युनूस पिंजारी (वय १९) याला अटक केली आहे.
आरोपीने विद्यार्थिनीचे शहरातील एका खासगी क्लासच्या स्वच्छतागृहात तसेच एका हॉटेलच्या खोलीत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो सतत विद्यार्थिनीला त्रास देत होता.

तसेच आरोपी वारंवार मोबाईलवर संपर्क साधून विद्यार्थिनीला धमकावत होता. तिच्याकडून आणखी व्हिडिओ व विवस्त्र फोटो मागण्याचाही प्रयत्न करत होता. या धमक्यांमुळे पीडित विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रस्त झाली होती.
हा प्रकार बराच काळ सुरू असल्याने अखेर पीडित मुलीने धाडस करून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपी हुजेफ पिंजारी याच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!
केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब
झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल
तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!
धक्कादायक बातमी : इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ…
महत्वाची बातमी : तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती










