Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

najarkaid by najarkaid
March 12, 2026
in Uncategorized
0
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(नजरकैद न्यूज)-: जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. Banana Crop Insurance Scam Jalgaon प्रकरणात केळीची लागवड नसतानाही हजारो शेतकऱ्यांनी विमा काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. कृषी विभागाला मिळालेल्या अहवालानुसार तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढण्यात आला होता. या प्रकरणात शासनाच्या सुमारे २५० कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा डाव उधळला गेला असून आता दोषींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

धक्कादायक बातमी : इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ…

महत्वाची बातमी : तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

Banana Crop Insurance Scam Jalgaon: ४५ हजार हेक्टरवर बोगस विमा
जळगाव जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान ‘एमआरसॅक’ (MRSAC) मार्फत करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत मोठा घोटाळा समोर आला. अहवालानुसार जिल्ह्यातील सुमारे २८ हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात केळीची लागवडच नव्हती, तरीही कागदोपत्री केळी लागवड दाखवून विमा उतरवण्यात आला.
या प्रकरणात २७ हजार ४१९ शेतकऱ्यांनी लागवड नसतानाही केळी दाखवून विमा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्रावर एकाच शेतावर ४ ते ५ शेतकऱ्यांनी विमा काढल्याचेही आढळून आले. अशा शेतकऱ्यांची संख्या सुमारे २९ हजारांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा
या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे.
Banana Crop Insurance Scam Jalgaon प्रकरणात एकूण ५५ हजार शेतकऱ्यांना मोबाईलवर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.त्यात केळी लागवड नसताना विमा काढणारे – २७ हजार शेतकरी
दुसऱ्याच्या शेतावर विमा काढणारे – २९ हजार शेतकरी
या सर्वांना ७ दिवसांत तालुका कृषी कार्यालयात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
शासनाचे १७९ कोटी रुपये वाचले
हा घोटाळा वेळेत उघडकीस आला नसता तर केंद्र व राज्य शासनाचे मोठे नुकसान झाले असते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,शासनाचा हप्त्यापोटी जाणारा खर्च – १७९ कोटी रुपये संभाव्य भरपाईसह एकूण रक्कम – सुमारे २५० कोटी रुपये मात्र, तपासामुळे हा डाव फसला असून बोगस ठरलेल्या शेतकऱ्यांनी भरलेली सुमारे ३७ कोटी रुपयांची विमा रक्कम शासनाने जप्त केली आहे.

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

चोपडा तालुक्यात सर्वाधिक गैरप्रकार
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये हा प्रकार आढळून आला आहे. त्यापैकी चोपडा तालुका बोगस विम्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
तालुकानुसार बोगस शेतकरी संख्या:
चोपडा – ७,२४३
यावल – ५,३६८
रावेर – ४,८६१
जळगाव – ३,४९०
धरणगाव – २,६३४
मुक्ताईनगर – २,३०४
जामनेर – १,५१९
चोपडा तालुक्यात ८ हजार ४१९ हेक्टर क्षेत्रावर केळी नसतानाही केळी दाखवून विमा काढल्याचे समोर आले आहे.
४८ सीएससी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता
या प्रकरणात केवळ शेतकरीच नव्हे तर सीएससी (Common Service Center) केंद्रांवरही संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये ४८ सीएससी केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात बोगस विमा अर्ज भरले गेल्याचे तपासात आढळले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या केंद्रांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

कृषी विभागाचा इशारा
जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी सांगितले की,
जिल्ह्यातील केळी पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे तांत्रिक पडताळणीत स्पष्ट झाले आहे. ज्या शेतांवर केळीची लागवड नाही, त्या ठिकाणी विमा काढून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा शेतकऱ्यांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित सीएससी केंद्रांवरही कारवाई केली जाईल.
पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
Banana Crop Insurance Scam Jalgaon प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हजारो शेतकरी, सीएससी केंद्र चालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने पुढे प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

Next Post

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

Related Posts

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Next Post
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us