मुंबई – दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. पण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेणार नाही,” असे मत मुखमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडले. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावर माध्यमांसमोर बोल होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.















