पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे, याचं वेळी भाजपाचे टॉपचे नेते राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुद्धा (cabinet minister) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे आता भाजचा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच बदलणार असल्याचं मानलं जातं असून महाराष्ट्रातील मातब्बर राजकारणी म्हणून ओळख असलेल्या विनोद तावडे(vinod tawade) यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ 6 जून रोजी संपला आहे, कालच जे. पी.नड्डा यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचं निश्चित मानलं जातं आहे. जेपी नड्डा यांच्याआधी Amit shaha आणि Nitin Gadkari हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
जेपी नड्डा 2019 साली भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बनले, त्यानंतर 2020 साली त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती दरम्यान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नावाची भाजप राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चा होती,परंतु आता शिवराजसिंह चौहान यांनीही पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यामुळे आता जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच निवडला जाणार आहे.
विनोद तावडे यांचं पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका
विनोद तावडे यांची भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती केली आहे.देशातील बिहारसारख्या संवेदनशील, पक्षाला प्रतिकूल आणि महत्वाचे राज्य असलेल्या बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.या सर्व जबाबदाऱ्या दिल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात चांगलाच जम बसवला. आणि ते पक्षनेतृत्वाच्याही जवळ पोहोचले.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उमेदवारी असलेली पहिली यादी जाहीर करणे, भाजपच्या जाहीरनामा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, एनडीएला मिळालेल्या तिसऱ्या मोठ्या विजयानंतर भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील सगळ्या महत्त्वाच्या बैठका, एनडीएच्या घटक पक्षांमध्ये समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका पाहायला मिळाली आहे त्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवू शकते. असं असलं तरी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.