Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूकीतील मतदान टक्का वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा होणार कार्यान्वित

najarkaid live by najarkaid live
April 27, 2024
in Uncategorized
0
निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव दि. 27 (प्रतिनिधी) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात गरोदर माता, दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासोबतच आरोग्याच्या कोणत्याही समस्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना उद्भवू नये याकरिता आरोग्य विभागाचे पथकासोबतच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांना मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

                         जळगाव जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या सुरू असलेला उन्हाळा व मे महिन्यात तापमानाचा पारा वाढू शकतो हे लक्षात घेऊन उन्हाचा कोणताही परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे पूर्णपणे दक्षता घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 61 हजारगरोदर माता आहेत.वाढत्या उन्हाचा परिणाम गरोदर मातांच्या प्रकृतीवर होऊ नये व गरोदर मातांसह दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता सकाळ सत्रात ऊन वाढण्याच्या अगोदरच या तीनही घटकातील मतदारांनी उस्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा पुरवण्याकरिता दक्षता घेण्यात येणार आहे. याबरोबरच अलीकडे बाळंत झालेल्या महिलांना आपल्या बाळासोबत मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदान केंद्रांवर पाळणा घर देखील स्थापन करण्यात येणार आहेत.

              घरगुती काम करण्यात व्यस्त असलेल्या महिलांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता काही वेळ सुट्टी देण्यात यावी असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन हजार अशा स्वयंसेविका व 3 हजार 941 अंगणवाडी सेविका या कामात सहभागी होणार आहेत. गरोदर माता, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांनी उन्हाचा पारा वाढण्या आगोदर सकाळ सत्रात जास्तीत जास्त मतदान करावे याकरिता घरोघर जाऊन आशा स्वयंसेवी का जनजागृती करणार आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना काही त्रास उद्भवल्यास लागलीच त्यांच्यावर उपचार करता यावे याकरिता आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात येणार आहे.वाढते ऊन ,आरोग्य आणि इतर कारणामुळे मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करून अधिक प्रमाणात मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेस चा कर्नाटकी कट हाणून पाडा

Next Post

जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी रिंग रोड परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us