Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निर्भया फंड त्वरित विनियोगाची कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in राज्य
0
निर्भया फंड त्वरित विनियोगाची कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांत दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. पोलिस महासंचालक कार्यालयात ही बैठक झाली. महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. मागील काही कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. या निधीचा कशा पद्धतीने त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र पोलिस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलिस महासंचालकांच्या परिषदेत झाली. पाेलिसांनी महिला अत्याचाराच्या प्रकरणांत तत्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे. पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे. सर्वसामान्य नागरिकाला आदर आणि दरारा वाटेल अशा पद्धतीने पाेलिसांनी काम करावे. काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदवण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरूपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलिसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असेही ठाकरे म्हणाले. या बैठकीस राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलिस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधण्यात अाला.

मुंबईच्या सुरक्षेसाठी सतत सतर्क राहा : पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येईल यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क राहावे, अशाही सूचना त्यांनी या वेळी केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुस्लिमांना चिंता करण्याची गरज नाही: अमित शहा

Next Post

भारतातील सॅटेलाइटसह 4 देशांच्या 9 सॅटेलाइटची लॉन्चिंग, देशातील रीसॅट-2बीआर1 अंधारातही स्पष्ट फोटो घेण्यास सक्षम

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भारतातील सॅटेलाइटसह 4 देशांच्या 9 सॅटेलाइटची लॉन्चिंग, देशातील रीसॅट-2बीआर1 अंधारातही स्पष्ट फोटो घेण्यास सक्षम

भारतातील सॅटेलाइटसह 4 देशांच्या 9 सॅटेलाइटची लॉन्चिंग, देशातील रीसॅट-2बीआर1 अंधारातही स्पष्ट फोटो घेण्यास सक्षम

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us