मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक गुडन्यूज आहे. ती म्हणजेच राज्यातील तलाठी पदाची मेगाभरती राज्य सरकारने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल ४ हजार ६२५ जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत.
१७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील ४ हजार ६२५ विद्यार्थ्यांचं भवितव्य उजळणार आहे.
हे पण वाचा..
10वी+ITI पास आहात का? रेल्वेत निघाली बंपर नवीन भरती
खुशखबर! लिपिक, PO पदाच्या 8611 जागांसाठी निघाली मेगाभरती
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ऑफिसर बनण्याची संधी.. तब्बल 797 पदांवर निघाली भरती
या आदेश महसूल व वन विभागाकडून काढण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६२५ पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.