केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये 797 कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), ग्रेड II (तांत्रिक) ची भरती होणार आहे. अधिसूचनेनुसार, जूनियर इंटेलिजन्स ऑफिसर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 जून 2023 पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती टियर-1, टियर-2 आणि टियर-3 परीक्षेनंतर केली जाईल.
IB मध्ये ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. तपशीलवार अधिसूचना जारी केल्यानंतर पात्रता निकष, आरक्षण, परीक्षा अभ्यासक्रम इत्यादींविषयी माहिती उपलब्ध होईल.
किती पगार मिळेल?
निवड झाल्यानंतर, स्तर-4 (25500-811000) ग्रेड प्रमाणे वेतन मिळेल.
रिक्त पदांचा तपशील
अनारक्षित-325
EWS-79
OBC-215
SC-119
ST-59
आवश्यक पात्रता?
इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्समध्ये B.Sc किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर डिग्री.
वयोमर्यादा
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे.
अर्ज फी
अनारक्षित, EWS आणि OBC – रु 500
इतर – 450 रु
निवड प्रक्रिया खालील प्रमाणे :
ऑनलाइन लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

