पाचोरा- पाचोरा तालुक्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महा वादळामुळे ६० हजार ३७५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून २० गावांसाठी प्रथम हप्ता म्हणून १५ कोटी ५ लाख २५ हजार ५४० रुपये अनुदान तहसिल कार्यालयात जमा झाले असून सदरचे अनुदान दि. २६ रोजी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी आठ हजार रुपये व बागायतीसाठी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी मंजूर करण्यात आले आहेत. यात पाचोरा तालुक्यात १२ हजार ३०५ फळबागा तर ४८ हजार ७० हेक्टर शेत्रावरील १२७ गावातील ५२ हजार ३८७ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी बाजरी व फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. अनुदान प्राप्त झालेल्या गावांमधे डोकलखेडा, डोंगरगाव, वरखेडी, सावखेडा बु”, सांगवी प्र. भ., वडगांव कडे, वडगाव असेरी, वाघुलखेडा, मोहलाई, नगरदेवळा सीम, अंतुर्ली खु”, पिंपरी खु” प्र. पा., खाजोळा, बाळद बु”, बांबरुड प्र. बो., भोकरी, चिंचखेडा खु”, विष्णूनगर, सार्वे बु” प्र. पा. या गावांचा समावेश आहे.














