Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ ; ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार

najarkaid by najarkaid
November 28, 2022
in Uncategorized
0
चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ ; ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार
ADVERTISEMENT

Spread the love

जागतिक स्तरावर चंद्रावर जाण्याची स्पर्धा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. जगातील सर्व बलाढ्य देशांकडून चंद्रावर कायमस्वरूपी वस्तीसाठी योजना आखल्या जात आहेत. अशा परिस्थितीत चीनने  Moon वर मोठे बेस स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनातील अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने चीनने हे बेस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे चीनने म्हटले आहे.Race to capture the moon Dragon is competing with NASA, will set up its own base station चीनचे हे बेस स्टेशन अणुऊर्जेवर आधारित असेल असे बोलले जात आहे. यामुळे भविष्यातील चंद्रावर सोडण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये अंतराळवीरांना मदत होईल.

Race to capture the moon
Race to capture the moon

2028 पर्यंत पूर्ण होणार मोठे लक्ष्य!

चीनच्या मून एक्सप्लोरेशन प्रोग्रामचे प्रमुख वू वेरन यांनी एका चिनी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आम्ही आता आमचे स्वतःचे बेस स्टेशन उभारणार आहोत. ही नवीन प्रणाली चंद्रावरील स्टेशनची उच्च उर्जा आवश्यकता पूर्ण करेल. आमचे अंतराळवीर 10 वर्षांत चंद्रावर पोहोचतील. आम्ही हे स्थानक चीनचे नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन आणि रशियन स्पेस एजन्सी रोस्कोसमॉस यांच्या सहकार्याने विकसित करत आहोत. आणि ते 2028 पर्यंत पूर्ण होईल.

एक मेगावाट वीज निर्मिती

Chinese media report नुसार, हे बेस स्टेशन 1 मेगावॅट वीज निर्माण करू शकते, जे शेकडो घरांना वर्षभरासाठी वीज पुरवण्यासाठी पुरेसे आहे. अणुऊर्जेपासून निर्माण होणारी वीज ऑक्सिजन निर्माण करणे, उपकरणे चालवणे आणि पाणी काढणे अशा इतर गोष्टींसाठी वापरण्यात येणार आहे. मॅकॅक्सिन ग्लोबलच्या अहवालानुसार, चीनने स्थापन केलेल्या या बेस स्टेशनमध्ये प्रामुख्याने लँडर, हॉपर, ऑर्बिटर आणि रोव्हर तयार केले जातील. हे  moon station चालवण्यासाठी अणुऊर्जेचा वापर केला जाणार आहे. उच्च उर्जेमुळे बेस स्टेशन दीर्घकाळ चालण्यास मदत होईल.

ऑक्सिजन उत्पादन आणि पाण्याचा शोध

अणुऊर्जेच्या प्रणाली त्या संपर्क यंत्रणांना ऊर्जा पुरवण्यासाठी काम करतील, जी पृथ्वीशी सतत संपर्क ठेवण्याचे काम करतील. याशिवाय ही ऊर्जा चंद्राच्या पृष्ठभागावरून पाणी काढण्यात आणि तेथील प्रवाशांसाठी ऑक्सिजन तयार करण्यात मदत करेल. स्थानकात मोठे रोव्हर बसवण्यात येणार असून त्याचा वापर वाहतुकीसाठी केला जाणार आहे. यासोबतच हॉपर्स ही पुढील पिढीची साधनं असतील, जी पाणी शोधण्याचे काम करतील.

चीनच्या हालचालींवर नासाची प्रतिक्रिया

चीनच्या या घोषणेवर अमेरिकन अंतराळ संस्था नासाची प्रतिक्रिया समोर आली आहे. चंद्रावर कब्जा करण्याच्या उद्देशाने चीन आपल्या लष्करी अंतराळ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून याचा विचार करत असल्याचे नासाचे म्हणणे आहे. मात्र बीजिंगने हा आरोप साफ फेटाळून लावला आहे. 2013 मध्ये चीनने चंद्रावर पहिले मानवरहित लँडिंग केले होते. आता या देशाला या दशकाच्या अखेरीस आपले अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याची आशा आहे.

Spread the love
Tags: #Race to capture the moon
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची उत्तम संधी… GMC धुळे येथे विनापरीक्षा होणार थेट भरती ; तब्बल ‘इतका’ पगार मिळेल

Next Post

श्रद्धा हत्याकांडाप्रमाणेच आणखी भयानक घटना समोर ; आई-मुलानेच बापाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, अन्

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

श्रद्धा हत्याकांडाप्रमाणेच आणखी भयानक घटना समोर ; आई-मुलानेच बापाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, अन्

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us