जागतिक स्तरावर चंद्रावर जाण्याची स्पर्धा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. जगातील सर्व बलाढ्य देशांकडून चंद्रावर कायमस्वरूपी वस्तीसाठी योजना आखल्या जात आहेत. अशा परिस्थितीत चीनने Moon वर मोठे बेस स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनातील अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने चीनने हे बेस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे चीनने म्हटले आहे.Race to capture the moon Dragon is competing with NASA, will set up its own base station चीनचे हे बेस स्टेशन अणुऊर्जेवर आधारित असेल असे बोलले जात आहे. यामुळे भविष्यातील चंद्रावर सोडण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये अंतराळवीरांना मदत होईल.
2028 पर्यंत पूर्ण होणार मोठे लक्ष्य!
एक मेगावाट वीज निर्मिती
Chinese media report नुसार, हे बेस स्टेशन 1 मेगावॅट वीज निर्माण करू शकते, जे शेकडो घरांना वर्षभरासाठी वीज पुरवण्यासाठी पुरेसे आहे. अणुऊर्जेपासून निर्माण होणारी वीज ऑक्सिजन निर्माण करणे, उपकरणे चालवणे आणि पाणी काढणे अशा इतर गोष्टींसाठी वापरण्यात येणार आहे. मॅकॅक्सिन ग्लोबलच्या अहवालानुसार, चीनने स्थापन केलेल्या या बेस स्टेशनमध्ये प्रामुख्याने लँडर, हॉपर, ऑर्बिटर आणि रोव्हर तयार केले जातील. हे moon station चालवण्यासाठी अणुऊर्जेचा वापर केला जाणार आहे. उच्च उर्जेमुळे बेस स्टेशन दीर्घकाळ चालण्यास मदत होईल.
ऑक्सिजन उत्पादन आणि पाण्याचा शोध
अणुऊर्जेच्या प्रणाली त्या संपर्क यंत्रणांना ऊर्जा पुरवण्यासाठी काम करतील, जी पृथ्वीशी सतत संपर्क ठेवण्याचे काम करतील. याशिवाय ही ऊर्जा चंद्राच्या पृष्ठभागावरून पाणी काढण्यात आणि तेथील प्रवाशांसाठी ऑक्सिजन तयार करण्यात मदत करेल. स्थानकात मोठे रोव्हर बसवण्यात येणार असून त्याचा वापर वाहतुकीसाठी केला जाणार आहे. यासोबतच हॉपर्स ही पुढील पिढीची साधनं असतील, जी पाणी शोधण्याचे काम करतील.
चीनच्या हालचालींवर नासाची प्रतिक्रिया
चीनच्या या घोषणेवर अमेरिकन अंतराळ संस्था नासाची प्रतिक्रिया समोर आली आहे. चंद्रावर कब्जा करण्याच्या उद्देशाने चीन आपल्या लष्करी अंतराळ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून याचा विचार करत असल्याचे नासाचे म्हणणे आहे. मात्र बीजिंगने हा आरोप साफ फेटाळून लावला आहे. 2013 मध्ये चीनने चंद्रावर पहिले मानवरहित लँडिंग केले होते. आता या देशाला या दशकाच्या अखेरीस आपले अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याची आशा आहे.