मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. परंतु आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आवाहन केलं आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन केलं आहे.
काय म्हटलं आहे पत्रात?
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहितो आहे.
आमदार के. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं के. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.
हे सुद्धा वाचा..
सुसाईड नोट लिहून टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, हिंदी सिनेमासृष्टी हादरली
महावितरणमध्ये बंपर भरती ; 10वी, ITI पाससाठी संधी.. त्वरित अर्ज करा
VIDEO : मला गुलाबभाऊ म्हणून मर्यादित राहायचं नाहीय तर.. ; गुलाबराव पाटलांचे मोठे विधान
तुम्हीही शिधापत्रिकेसाठी अर्ज केलाय का? मग ही गोष्ट लक्षात ठेवा, डाउनलोड कसा कराल?
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे..
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझे मन सांगत.
अस करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.
आपला मित्र,
राज ठाकरे