जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखठोक भाषणांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांचं एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्याला जनता आणि कार्यकर्त्यांपुरता फक्त गुलाब भाऊ म्हणून मर्यादित राहायचं नाही तर पाणीवाला बाबा व्हायचंय, असं विधान गुलाबराव पाटील यांनी एका भाषणादरम्यान केले.
नेमके काय म्हणाले गुलाबराव पाटील?
पाणीपुरवठा खाते मिळाल्यास मला असं वाटलं आपण काहीतरी करू शकतो आणि त्यातूनच अनेक पाण्याच्या योजना या राज्यात दिल्या. अनेक योजना सुरू करणार असल्याचे स्पष्ट करत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं असल्याचं म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर श्रोत्यांमध्ये टाळ्यांचा गजर झाला. तसेच त्यांच्या भाषणातील या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मला गुलाब भाऊ नाही व्हायचंय, तर पाणीवाला बाबा व्हायचंय! गुलाबराव पाटलांचे मोठे विधान pic.twitter.com/JD1K6wNmJB
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 15, 2022
एकीकडे गुलाबराव पाटील पाणी पुरवठा योजनांच्या वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. पण त्यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात पिण्याचं पाणी वेळेवर मिळत नसल्याने अनेकवेळा लोकांनी याबद्दल आंदोलन केले आहे. त्यामुळे आता गुलाबराव पाटील त्यांच्या तक्रारींची दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.