Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

najarkaid by najarkaid
November 15, 2019
in राज्य, राजकारण
0
शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून, आजचा दुसरा दिवस आहे. अतिवृष्टीमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. शेतकऱ्यांच्या पिकांचं अभूतपूर्व नुकसान झालं आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी जास्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असून, केंद्राकडून शेतकऱ्यांना भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत आहेत, त्यावर तुम्ही काय सांगाल, असं त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राज्यात तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही. त्यामुळे पुन्हा आपलेच सरकार येईल. हे सरकार स्थापन झालेच तरी, सहा महिने टिकणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हतं,’ अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

मध्यावधी नाहीच, पाच वर्षे सरकार टिकणार
शरद पवार यांनी मध्यावधी होणार नाही, चिंता करू नका, असा धीर त्यांच्या पक्षाच्या आमदारांना दिला होता. नागपूरच्या पत्रकार परिषदेतही त्यांना मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतेबाबत विचारलं असता, मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार असावं आणि राज्यासमोरील यक्षप्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी व्हावं. जे काही योग्य असेल ते करण्याची आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुढे येथील जुवार्डी पूल ते जुवार्डी रस्ता प्रकरणी समाजकंटकांनी घातला पुन्हा एकदा खोडा !

Next Post

भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही: पाटील

Related Posts

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Next Post
भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही: पाटील

भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही: पाटील

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us