Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर

Editorial Team by Editorial Team
September 30, 2022
in राज्य
0
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : अतिवृष्टीमुळं बाधित असलेल्या मात्र, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचा राज्यातील अंदाजे पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते.  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक  शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

हे पण वाचा : 

राज्यातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा

भारतीय संघाला मोठा धक्का ; T20 वर्ल्ड कपमधून अनुभवी वेगवान गोलंदाज बाहेर

चालत्या ट्रेनमध्ये चोरी करणं महागात पडलं, चोराला खिडकीला लटकवलं, मग….पहा Video

अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा

आतापर्यंत सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ :
राज्य सरकारच्या या निर्णयाचा औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि सोलापूर या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा

Next Post

सणासुदीच्या काळात EMI महागला ; RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दरात केली वाढ

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Next Post
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

सणासुदीच्या काळात EMI महागला ; RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दरात केली वाढ

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us