सध्या सोशल मीडियावर एका प्रेमी युगलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतांना दिसत असून या व्हिडीओतून प्रेमी युगलाच्या बेधुंद थिरकन्या बरोबर काही गमतीशीर किस्सा पाहायला मिळाला आहे. सोशल मिडीयचा प्रभाव इतका वाढला आहे की आजकाल एखादी घटना घडली की ती कॅमेऱ्यात कैद होऊन लागलीच झपाट्याने सोशल मीडिया मध्ये व्हायरल होते.
नेमकं काय आहे या व्हायरल व्हिडिओत…
सोशल मीडियात तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हायरल व्हिडिओत समोरासमोर असलेल्या दोन रहिवाशी बिल्डिंगच्या खाली दोन तरुणी आणि एक तरुण उभे असल्याचे दिसत आहेत. यामध्ये एक प्रेमी युगल असल्याचं दिसत असून तरुण एका तरुणीला आपल्या दोन्ही हाताने उचलून बेधुंद पणे थिरकत असून गोल गोल फिरवू लागतो. प्रेमिकेला गोल फिरवताना प्रेमी एकक्षण स्थिर थांबून अश्लील चाळे देखील करताना दिसत आहे.या जोडप्याला एवढं देखील भान नाही की आपण एका रहिवाशी बिल्डिंगच्या रस्त्यावर खाली उभे आहोत.
हा सर्व प्रकार बिल्डिंग मध्ये वरती उभा असलेला एक व्यक्ती पाहत असतो त्याला या प्रकाराचा प्रचंड राग येतो. आणि वरतून पाण्याने भरलेली बकेट मधून पाणी या युगलाच्या अंगावर फेकताना दिसत आहे. दरम्यान अचानक झालेल्या या पाणी वर्षावामुळे प्रेमी युगल हे काय झालं असे हावभाव करत दचकून वरती पाहतात त्यानंतर या ठिकाणी आलेल्या दोनही तरुणी पळून जाऊ लागतात. त्यातील प्रेमी सुद्धा आपली स्कुटर घेऊन पळू लागतो, वर बिल्डिंग मध्ये असलेला व्यक्ती फक्त पाणी टाकून थांबत नाही तर त्या प्रेमी तरुणाला चप्पल फेकून मारताना दिसत आहे आणि जोराने आवाज देतांना दिसत आहे.