
जळगाव – जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपा, शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सुरेश (राजूमामा) दामू भोळे हे आपला उमेदवारी अर्ज जळगाव येथे आज (दि.3) रोजी सकाळी 10 वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरणार आहे.यावेळी महायुतीच्या नेत्यांसह, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तेने उपस्थित राहणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी 10 वाजता जी.एम. फाऊंडेशन, शिवतीर्थासमोरुन रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीनंतर राजूमामा भोळे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. तरी याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकार्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपा महानगर आणि शिवसेना रिपाई महायुतीतर्फे करण्यात आले आहे.















