Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा रेल्वे स्थानकावररोटरी क्लब तर्फे स्वच्छता विषयक जनजागृती !

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in जळगाव
0
पाचोरा रेल्वे स्थानकावररोटरी क्लब तर्फे स्वच्छता विषयक जनजागृती !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम व स्वच्छता विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रेल्वे विभागातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवडा निमित्त पाचोरा रेल्वे स्थानकाला “बेस्ट मेंटेन ब वर्ग स्टेशन” या गटातून “प्रथम पुरस्कार” प्राप्त झाला असून 1 ऑक्टोंबर रोजी भुसावळ येथे झालेल्या एका विशेष समारंभात पाचोरा रेल्वे हे स्थानकाचे स्टेशन मास्तर एस.टी. जाधव यांना मध्य रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वच्छतेचे प्रथम मानांकन पटकावल्या बद्दल रोटरी क्लब च्या पदाधिकाऱ्यांनी एस.टी. जाधव यांना सन्मानित केले.
येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ भूषण मगर-पाटील, सेक्रेटरी डॉ बाळकृष्ण पाटील व रेल्वे स्टेशन मास्तर एस.टी. जाधव यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन झाले.
यानिमित्ताने रेल्वे स्थानकावरील कर्मचारी व प्रवाशांना प्लास्टिक बंदी तसेच रेल्वे परिसर आणि आणि रेल्वे प्रवास करीत असताना घ्यावयाची काळजी याबाबत उद्बोधन करण्यात आले. घर परिसर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छते विषयक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पाचोरा रेल्वे स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी व रोटरी क्लब सदस्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. याप्रसंगी रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक चंद्रकांत कवडे, आर. पी. एफ. पोलीस उपनिरीक्षक संजय बी. पाटील, मुख्य बुकिंग सुपरवायझर जॉर्ज सालोमन, मुख्य तिकीट निरीक्षक नितीन दिवरे, आरोग्य निरीक्षक एच. आर. मीणा, निरीक्षक रवींद्र इंदवे, शरद अहिरे, तसेच रोटरी क्लबचे सहसचिव शिवाजी शिंदे, डॉ.दिनेश सोनार, डॉ. अमोल जाधव, डॉ गोरख महाजन, गोपाल पटवारी, पंकज शिंदे, निलेश कोटेचा, आदी रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते.
यानिमित्ताने पाचोरा येथील संत निरंकारी सत्संग सेवा समितीच्या स्वयंसेवकांनी सुद्धा रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलीप वाघ यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद सामनेर ग्रामस्थांनी केला परिवर्तनाचा निर्धार !

Next Post

जळगाव शहर विधानसभेसाठी आ.राजूमामा भोळे आज अर्ज भरणार !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us