या प्रसंगी आपले मनोगत मांडतांना श्रीराम दादा पाटील यांनी दिलेल्या पुरस्कारासंदर्भात आभार व्यक्त करत गेल्या २ ते ३ वर्षांपासुुन कोरोना संसंर्गाने अक्ख्या जगात थैमान मांडलेले असतांना सुद्धा आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, व आपल्यावर झालेले संस्कार हे मातृत्व, दातृत्व या सारखे असल्यामुळे आपण स्वत:हुन पुढाकार घेऊन समाजाची सेवा करावी या उद्देशाने काम करीत आहे व करीत राहणार याची ग्वाही दिली.
समाजातील तळागाळातील शेतकऱ्यांना कमी दरात आपल्या कंपनीचे चांगल्या प्रतीचे उत्पादन उपलब्ध व्हावे याकडे त्यांचे विशेष लक्ष असते, तसेच आपल्या जिल्ह्यातील गरजु व होतकरु विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये यासाठी त्यांनी आनंद शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मॅक्रोव्हिजन अकेडमी स्कूल च्या अंतर्गत अत्यंत चांगल्या प्रतीचे शिक्षण उपलब्ध करुन दिले.
आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय , प्रशासकीय, उद्योग व आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथजी माधवराव पाटील यांनी आयोजन केले होते.
या प्रसंगी श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन चे संचालक प्रमोद (राजूदादा) पाटील, दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपालजी दर्जी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राम पवार, पाटील बायो टेकचे प्रमोद नाना पाटील, सुरेंद्रजी पाटील, राहुलजी पवार तसेच शहरातील व रावेर, यावल मतदार संघातील विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. श्रीराम दादा पाटील यांना त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेल्या आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उद्योग व आदी क्षेत्रात कामांची ही पावतीच असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.